तुम्हाला डिझेल कारचे फायेद माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला त्याचीच माहिती देणार आहोत. जेव्हा जेव्हा नवीन कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा एक मोठा प्रश्न असतो की पेट्रोल कार खरेदी करायची की डिझेल कार? इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनेही आता बाजारात उपलब्ध आहेत, मात्र डिझेल कारची लोकप्रियता आजही कायम आहे.
डिझेल इंजिन त्यांच्या दमदार परफॉर्मन्स, मायलेज आणि दीर्घायुष्यासाठी ओळखले जाते. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डिझेल कारच्या या 5 मोठ्या फायद्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
लांब पल्ल्यासाठी सर्वोत्तम
डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा चांगले मायलेज देतात. जर तुम्ही लाँग ड्राईव्हवर खूप जात असाल किंवा लांबचा प्रवास करत असाल तर डिझेल कार तुमच्यासाठी परवडणारा पर्याय ठरू शकते. उदाहरणार्थ, जर एक पेट्रोल कार 15 किलोमीटर प्रति लीटरमायलेज देत असेल तर डिझेल कार 20 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत जाऊ शकते. यामुळे डिझेल कार दीर्घकाळ आपल्या खिशावर हलकी पडते.
मजबूत इंजिन
पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन अधिक मजबूत आणि टिकाऊ असते. हेच कारण आहे की व्यावसायिक वाहने (ट्रक, बस, टॅक्सी) बहुतेक डिझेल इंजिनवर धावतात. डिझेल इंजिनमध्ये पेट्रोल इंजिनपेक्षा कमी कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक्स असतात, त्यामुळे ते कोणत्याही समस्येशिवाय जास्त काळ चालू शकतात. डिझेल इंजिनचे आयुष्यही जास्त असते आणि सुसज्ज डिझेल कार 3-5 लाख किलोमीटर सहज धावू शकते.
टॉर्क आणि पॉवर
डिझेल इंजिन उत्तम टॉर्क आणि लो-एंड पॉवर देते. हेच कारण आहे की डिझेल कार आणि विशेषत: एसयूव्ही आणि अवजड वाहने खडबडीत रस्त्यांवरही चांगली कामगिरी करतात. महामार्गावर डिझेल गाड्यांना ओव्हरटेक करणे सोपे जाते. तसेच, ऑफ-रोडिंग आणि माउंटन रोडसाठी उत्तम पर्याय आहेत.
डिझेल जास्त किफायतशीर
जर आपण वारंवार लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल किंवा आपली कार बहुतेक हायवेवर धावत असेल तर डिझेल कार हा सर्वात योग्य पर्याय असू शकतो. महामार्गावर इंधनाची कार्यक्षमता चांगली आहे. लांबच्या प्रवासात पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त किफायतशीर आहे आणि जास्त टॉर्क मुळे त्याचा प्रवास सुरळीत होतो.
पेट्रोल आणि डिझेलचे दर वेळोवेळी बदलत असतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त राहते. अशावेळी तुम्ही व्यावसायिक वापरासाठी (कॅब, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट) कार खरेदी करत असाल तर डिझेल इंजिन अधिक फायदेशीर ठरेल.