गेल्या काही दिवसापासून करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या विरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यातच आज वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये मेटेन्स रक्कम द्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यावर आता धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव मुंडेने त्याची आई करुणा शर्मावर गंभीर आरोप केले आहेत. “माझी आई माझ्यासोबत, माझ्या बहिणींसोबत आणि माझ्या वडिलांसोबत घरगुती हिंसाचार करायची. माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितलं. कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं”, असा धक्कादायक खुलासा शिशीव मुंडेने केले आहे. आता यावर करुणा शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
करुणा शर्मा यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुलगा शिशीव मुंडेच्या पोस्टबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केले. “जर माझ्या मुलाचा आणि मुलीचा माझ्याविरोधात वापर केला, तर मी सर्व काढणार”, असा धमकीवजा इशारा करुणा शर्मा यांनी दिला.
“माझ्या मुलावर किती प्रेशर दिला जात आहे”
“माझ्या मुलाला कुठे ना कुठे तरी त्रास होत आहे. आज जे कोणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी होते त्यांनी पाहिलं आहे की माझ्या मुलावर किती प्रेशर दिला जात आहे. त्याला किती फोन येते होते. ते फोन ऐकल्यानतंर तो किती तणावाखाली होता. पण ती गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही. माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे वाद आहेत, त्याचा त्रास त्यांनाही होत आहे. त्यांनाही ती लोक त्रास देतात”, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
हे सुद्धा वाचा
“माझ्याविरोधात तो कधीही जाणार नाही”
“माझा मुलगा, मुलगी, नवरा हे सर्वजण कोर्टातील केस परत घ्या असे मला वारंवार सांगत आहे. कोर्ट केस करु नका. हा वाद संपवा. मी पण हा वाद संपवण्यासाठी तयार आहे. पण आज मुलाबाळांना त्रास होत आहे. आज अचानक कोर्टाकडून निकाल लागला. मीडियाचे प्रतिनिधी घरी आले. मी धनंजय मुंडेंबद्दल काहीही बोलले नाही. तरीही ही लोक माझ्या मुलाला त्रास देत आहेत. त्यांना हे बोला, ते बोला, असा सतत दबाव येत आहे. माझा मुलगा असा नाही. तो कधीच अशी पोस्ट करणार नाही. माझ्याविरोधात तो कधीही जाणार नाही. पण त्यांनाही प्रेशर दिला जात आहे”, असे करुणा शर्मांनी सांगितले.
तीन वर्षांपासून ते खूप सहन करतात
“धनंजय मुंडेंनी फोन केला आणि मीडियाला बाहेर काढा असे सांगितले. काय करणार, आम्ही एकटे आहोत, मुलगा मुलगी खूप लहान आहेत. तीन वर्षांपासून ते खूप सहन करत आहेत. आईला दोन वेळा जेलमधलं टाकलं, मारहाण करणं, ते खूप लहान आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. सोसायटीचा मेटेन्स रखडला. पालिकेची नोटीस आहे. काल मी मुलाला ही पाठवली आहे. माझ्या मुलाचा आणि मुलीचा माझ्याविरोधात वापर केला, तर मी सर्व काढणार. कोणाकडे २५ हजार कोटींची प्रॉपर्टी आहे दलाली करुन”, असेही करुणा शर्मांनी म्हटले.