शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहात या बाबींची होणार पाहणी :
विद्यार्थ्यांची उपस्थिती, पटावरील संख्या, शिक्षक , कर्मचा-यांची माहिती, अन्नधान्याचा दर्जा, कोठीगृह रजिस्टर, अन्नधान्य व भाजीपाला साठवणुकीची पध्दत, स्वयंपाकाचा गॅस, शेगडीची व्यवस्था, आश्रमशाळा व वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची व आंघोळीच्या गरम पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ फिल्टर मशीन लावले आहे का, ते सुस्थितीत आहे का, मुला-मुलींकरीता स्वतंत्र स्नानगृह व शौच्छालय, तेथील स्वच्छता, मुलींना सॅनॅटरी नॅपकीन दिले जाते का, सॅनॅटरी नॅपकीन वेंडीग मशीन लावले आहे का, विद्यार्थीनींच्या वसतीगृहात धोक्याची सुचना देणारी प्रणाली कार्यान्वित केली आहे का, मुलींना वसतीगृहात असुरक्षित तर वाटत नाही ना, विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गाद्या, बेडशीट, उशी सुस्थितीत आहे का, वसतीगृहात व आश्रमशाळेत खिडक्या, लाईट व्यवस्था, विद्युत फिटींग, पंखे, सीसीटीव्ही बसविले आहे का, त्यापैकी किती कार्यान्वित आहे, अग्निशमन यंत्र, संगणक कक्ष, तक्रार पेटी आदी बसविले आहे का. तसेच आश्रमशाळेत किंवा वसतीगृहात विशाखा समितीची स्थापना केली आहे का. या बाबी जाणून घेण्यात येणार आहे.