राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी. (Image source- X)
Published on
:
06 Feb 2025, 11:07 am
Updated on
:
06 Feb 2025, 11:07 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : "सबका साथ, सबका विकास, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच देशाने आपल्या सर्वांना येथे बसण्याची संधी दिली आहे; पण काँग्रेसचा विचार केला तर, त्यांच्याकडून 'सबका साथ, सबका विकास' अशी अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल असे मला वाटते. हे त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. ते त्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. कारण एवढा मोठा पक्ष एकाच कुटुंबाला समर्पित झाला आहे. त्याच्यासाठी, सर्वांचा पाठिंबा आणि सर्वांचा विकास शक्य नाही," अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.६) राज्यसभेत विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होते. खोटेपणा, कपट, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण यांचे मिश्रण असणारे राजकारणाचे मॉडेल काँग्रेसने तयार केले आहे. अशा प्रकारचे मिश्रण असते तिथे सर्वांचे सहकार्य आणि सर्वांचा विकास होऊ शकत नाही. काँग्रेस मॉडेलमध्ये कुटुंब प्रथम सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्याची धोरणे, मार्ग, भाषण आणि वर्तन फक्त त्या एकाच गोष्टीला हाताळण्यातच खर्ची पडले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आमचे विकासाचे मॉडेल 'राष्ट्र प्रथम'...
२०१४ नंतर देशाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. मी देशातील जनतेचा आभारी आहे, त्यांनी आम्हाला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. 'राष्ट्र प्रथम' हे आमचे विकासाचे मॉडेल आहे. देशातील जनतेने आमच्या विकास मॉडेलची चाचणी घेतली आहे, ते समजून घेतले आहे आणि पाठिंबा दिला आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
Speaking in Rajya Sabha, PM Modi says, "Expecting 'Sabka Saath, Sabka Vikas' from Congress will be a huge mistake. It is beyond their thinking and it also doesn't suit their roadmap because the whole party is dedicated only to one family." pic.twitter.com/HDWNeOkNwd
— ANI (@ANI) February 6, 2025