अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. हा खटला जिंकल्यानतंर आता करुण शर्मा या अॅक्शन मोडवर आल्या आहेत.
करुणा शर्मा यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले. मी धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार आहे. धनंजय मुंडेची दुसरी पत्नी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली आहे. बेकायदेशीरपणे केली आहे. त्यावरही मी दावा करणार आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
मुंडेंनी दुसरं लग्न करताना माझी परवानगी घेतली नव्हती. मला त्याची माहिती नव्हती. मी त्यावेळी इंदोरमध्ये होते, असेही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
बातमी अपडेट होत आहे….