रविंद्र जडेजा वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळत आहे. इंग्लंड विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 9 षटकं टाकली आणि 3 महत्त्वाचे विकेट घेतले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडचा डाव 248 धावांवरच आटोपला. यासह रवींद्र जडेजाने एका खास पंगतीत स्थान मिळवलं आहे.
रविंद्र जडेजाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शेवटचा खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याची झोळी रिती राहिली होती. त्यानंतर आता 452 दिवसानंतर त्याला विकेट मिळाली. रविंद्र जडेजाने 12 नोव्हेंबर 2023 रोजी वनडे क्रिकेटमध्ये नेदरलँडविरुद्ध 9 षटकात 49 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.
1 / 5
रविंद्र जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा जो रूटची विकेट काढली. जो रूटने 10 डावात त्याच्या 133 चेंडूचा सामना केला. यात त्याने 115 धावा दिल्या आणि 4 वेळा त्याला बाद केलं. वनडेत जो रूटला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या नावावर आहे.
2 / 5
रविंद्र जडेजाने या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 9 षटक टाकली. यात एक निर्धाव षटक टाकलं आणि 26 धावा देत तीन गडी बाद केले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. वनडेत तिसरी विकेट घेताच त्याने या विक्रमाची नोंद केली आहे.
3 / 5
जडेजाने 352 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 600 विकेटचा पल्ला गाठला आहे. रविंद्र जडेजा 2009 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यात कसोटीत त्याने 323, वनडेत 223 आणि टी20 क्रिकेटमध्ये 54 विकेट घेतल्या आहेत.
4 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिल कुंबळेने 953, आर अश्विनने 765, हरभजन सिंगने 707 आणि कपिल देवने 687 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)
5 / 5