टाकवडे येथील विहरीत दुचाकी शोधण्यासाठी पोलिसांनी मोहिम राबविलीPudhari Photo
Published on
:
06 Feb 2025, 2:39 pm
Updated on
:
06 Feb 2025, 2:39 pm
शिरढोण / पुढारी वृत्तसेवा: इचलकरंजी येथील सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गणपती फेस्टिव्हलमध्ये चोरण्यात आलेल्या दोन मोटारसायकलीची शोध मोहीम टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावरील असणाऱ्या पोळसाच्या विहिरीत गुरुवारी दिवसभर करण्यात आली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाल्याने या विहिरीत पोलिसांनी या विहिरीत सुरू केलेली शोधमोहीम अपयशी ठरली.
पोलीस तपासात दोन मोटरसायकल या विहिरीत फेकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेरवाड (ता.शिरोळ)येथील एका संशयतीला बेड्या घालून याठिकाणी आणण्यात आले होते. दरम्यान त्याच्या सांगण्यावरून या विहिरीत शोधाशोध सुरू करण्यात आली. फेस्टिव्हेलमध्ये चोरी झालेल्या ६ मोटरसायकलपैकी २ मोटर सायकल या विहिरीत फेकले असल्याची चर्चा याठिकाणी होती. गुरुवारी दिवसभर या गाड्यांची शोध मोहीम करण्यात आली मात्र विहिरीत ६० ते ७०फूट पाणी तसेच झाडांच्या सावलीमुळे पाण्यात बुडून शोधणाऱ्या लोकांना अडचण निर्माण झाल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली. रस्त्याच्या कडेलाच ही विहीर असल्याने येणारे जाणारे प्रत्येकजण याठिकाणी गर्दी करू लागल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही शोधमोहीम अर्धवट ठेवली.