हिंगोली (Hingoli) :- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (Government hospitals) ६ फेब्रुवारी रोजी सॉस कॅम्पीयन चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम यांनी प्रस्तावीकात सांगितले की सॉस कॅम्पीयनच्या मार्गदर्शन सुचना नुसार सन २०२५ पर्यंत बालकांमधील न्युमोनियामुळे (Pneumonia) होणाऱ्या बालमृत्युंचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमागे ३ पेक्षा कमी करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.
न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती
तसेच बालकामधील न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे व न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना सक्षम बनविणे न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चूकीच्या कल्पना या बाबत मार्गदर्शन केले. या नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा कृप्पास्वामी यांनी न्यूमोनिया आजारामध्ये घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार व ० ते ५ वर्षवयोगटातील लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी सुध्दा न्युमोनियाआजारा बाबत मार्गदर्शन केले.
तसेच आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल नगरे यांनी पार पाडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिचंकर (मेट्रन) श्रीमती आशा क्षीरसागर (सहाय्यक मेट्रन), श्रीमती. पहुरकर (सा. आ. परिचारीका), श्रीमती. दांडेकर, श्रीमती. वर्षा खंडारे, प्रिती कांबळे, गोविंद देशमुख यांनी मदत केली. या कार्यक्रमाला डॉ. बिडकर, डॉ. भालेराव, डॉ. विशाल पवार, डॉ. मनिष मुपकलवार, डॉ. अमोल परळीकर, श्रीमती. घोरपडे, श्रीमती. शिंदे,टाले, श्रीमती. शितल सुनके, राजेंद्र देशमुख, श्रीमती. रागिणी जोशी,श्रीमती. मनिषा खंडारे, श्रीमती. स्नेहा थोरात, श्रीमती. पुष्पा कडवे व शासकिय महाविद्यालयातील विद्यार्थी व रुग्णालयातील गरोदर माता, लहान बालके उपस्थित होते.