वकील गुणरत्न सदावर्ते हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच ‘टीव्ही ९ मराठी’ने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी करुणा शर्मा प्रकरणाचा गुणरत्न सदावर्ते यांनी अर्थ समजवून सांगितला.
मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेविरोधात मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयात करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच ‘टीव्ही ९ मराठी’ने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी करुणा शर्मा प्रकरणाचा गुणरत्न सदावर्ते यांनी अर्थ समजवून सांगितला. तर धनंजय मुंडे यांच्याप्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली, याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. करुणा शर्मांना निकाल मान्य नसेल तर मग त्याचा अर्थ काय काढायचा? मग निकालावर राजकारण का होतंय? असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही संदर्भ देत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
हा निकाल अंतिम नसल्याचे सांगत सदावर्ते म्हणाले, केस लढण्याबाबत मी काही बोलणार नाही. हा निकाल अंतरिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे. त्यात कुठेही हिंसा केलीय असं म्हटलं नाही. बायको किंवा नवरा आहे, असंही नमूद केलं नाही. या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. हे पहिलं न्यायालय आहे. त्यावर रिव्हिजन आहे. अपील आहे. रिट आहे. नंतर सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे एखाद्या निकालावर खोलात पाय गेला, अडचणी वाढल्या, राजीनामा दिला पाहिजे, हे निकालाचं राजकारणी करण करत आहोत. त्यामुळे या निकालाचे अनेक अर्थ काढू नये. पुढे सदावर्ते असेही म्हणाले, निकालात डिक्री झाली नाही. कोर्टाने नवरा बायको म्हणून डिक्लेअर केलं नाही. त्यामुळे कुणाला काय मानायचं ते मानू शकता. कुणी काही मानणं हा निकाल नसतो. निकालाच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही. हा निकाल अंतरिम स्वरुपाचा आहे. तो फक्त मेंटेनन्स पुरता मर्यादित आहे. आर्थिक कारणासाठी हा निकाल दिला आहे. कौटुंबिक हिंसा झाली असंही कोर्टाने म्हटलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Feb 06, 2025 05:13 PM