सभागृहात गदारोळ, राज्यापालांचे भाषण सुरू होताच विरोधकांचा सभात्याग file photo
Published on
:
06 Feb 2025, 7:06 am
Updated on
:
06 Feb 2025, 7:06 am
पणजी : राज्य विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यपालांचे भाषण सुरू झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी विविध मागण्यांसाठी गोंधळ घालत फलक झळकावले. त्यानंतर सभात्याग करत सभागृह सोडले. विरोधकांपैकी केवळ विजय सरदेसाई सभागृहात होते.
या अधिवेशनात ४६ तारांकित, तर १८८ अतारांकित प्रश्न आले असून, सरकारतर्फे ५ विधेयके मांडली जातील. खासगी विधेयकांची संख्याही ५ आहे. याबरोबर ५ ठराव या छोट्या अधिवेशनात विधानसभा पटलावर येतील, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उलमन यांनी दिली. अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी असल्याने विरोधक नाराज असले, तरी ते आक्रमक पवित्र्यात आहेत. दुसरीकडे सत्ताधारी सावध पवित्र्यात असून विरोधकांच्या रणनीतीला ठोस उत्तर देण्याची तयारी त्यांनी केली आहे.