आठ दिवसांपूर्वीच आंदोलनाचा इशारा देऊनही महावितरणने केलेल्या दुर्लक्षामुळे शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे. शेतातील पिके पाण्याअभावी जळत आहेत. शेतीसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, यासाठी नगर- सोलापूर महामार्गावर शेकडो शेतकर्यांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या दणक्यामुळे महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकर्यांशी चर्चा केली. पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी योग्य उपाययोजना करू, असे लेखी आश्वासन शेतकर्यांना दिले.
आंदोलनात जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, दादासाहेब दरेकर, माजी सरपंच सुनील म्हस्के, जयवंत शिंदे, माजी सभापती राम साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के, रुईछत्तीशीचे सरपंच रमेश भांबरे, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, महेश म्हस्के, अॅड पोपट म्हस्के, जावेद शेख, गणेश हिंगे, सुनील म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, वाटेफळचे सरपंच बाबासाहेब अमृते, रवी अमृते, बाबासाहेब चितळकर, पोपट गुंड, रामा चितळकर, विशाल बोचरे , पोपट पोटरे, बाबासाहेब बनकर, नाना गायकवाड, श्रीधर पवार, संपत वाघमोडे, भाऊसाहेब आन्हाड, तांदळीचे सरपंच दीपक घिगे,अनशाबापू म्हस्के, दत्तात्रय बनकर, पारगावचे सरपंच बोठे, सतीश म्हस्के, संतोष गुंड, नागेश वाघ आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.