वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरणात एक आदेश दिला आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचारा कायद्यातंर्गत खटला दाखल केलाा आहे. आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी काही मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. कोर्टाने काय ऑर्डर दिलीय? त्यात काय म्हटलय? ते धनंजय मुंडे यांच्या वकिल सायली सावंत यांनी स्पष्ट केलय.
– करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही
– मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे असं मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी आवाहन केलं आहे.
– आजचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही.
– धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुण शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव इनमध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली आहे, तोच या आदेशाचा आधार आहे.
– माध्यमांना विनंती आहे की, जबाबदारीने व अचूक वृत्तांकन करावे आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्ताकनापासून दूर राहावे.
– कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.
– विनाकारण कोणाचीही बदनामी करणारे वृत्त देऊ नये असे आवाहन केले आहे.