​​​​​​​क्रीडामंत्री भरणेंचा 'तोल' गेला अन् कोसळले:​​​​​​​व्हॉलिबॉल खेळताना घडली घटना, लोखंडी पोलवर डोके आपटताना थोडक्यात बचावले

5 hours ago 1
राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे गुरुवारी व्हॉलिबॉल खेळताना तोल जाऊन धाडकन पडल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांचे डोके एका लोखंडी पोलवर आदळणार होते, पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले. राज्याचे क्रीडामंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुवारी पुण्याच्या मावळ येथील एका महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी तेथील खेळाडू व क्रीडा शिक्षकांसोबत विविध खेळांचा आस्वाद घेतला. त्यात व्हॉलिबॉल खेळण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. व्हॉलिबॉल खेळताना त्यांनी काही चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवले. पण विरोधी बाजूने आलेला एक चेंडू अगदी जाळीजवळ पडण्याच्या स्थितीत होता. तो चेंडू टोलवण्यासाठी मंत्री भरणे त्याच्या दिशेने धावले असता त्यांचा अचानक तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. लोखंडी पोलला धडकण्यापूर्वीच स्वतःला सांभाळले या अनपेक्षित घटनेमुळे तिथे उपस्थित सर्वचजण भांबावले. पण दत्तात्रय भरणे यांनी आपल्या चेहऱ्यावरील हास्य मावळू न देता पुन्हा खेळण्यास सिद्ध झाले. विशेष म्हणजे भरणे ज्या ठिकाणी पडले तेथून जवळच जाळीचा लोखंडी पोल उभा होता. त्याला त्यांची टक्कर झाली असती तर त्यांच्यावर बाका प्रसंग बेतला असता. पण लोखंडी पोलवर धडकण्यापूर्वीच त्यांनी स्वतःला सांभाळले. त्यामुळे त्यांचे डोके फुटण्यासाठी थोडक्यात बचावले. पण या घटनेत मंत्री महोदयांना थोडाफार मुक्कामारही लागला. पण ते वेळीच उभे राहिल्यामुळे राज्याच्या क्रीडामंत्र्यांची तंदुरुस्ती दिसून आली. जो पडतो तोच सावरतो यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला यात काहीसा मुक्कामार लागल्याची कबली दिली. मला थोडा मुक्कामार लागला. पण राज्याच्या राजकारणात 2014 पडलो, पुन्हा 2019 ला राज्यमंत्री झालो. आता कॅबिनेट मंत्री झालो. जो पडतो तोच सावरतो, असे ते आपल्याला या पडण्याने काहीच झाले असे सांगताना म्हणाले. खाली पाहा व्हिडिओ कोरोना काळात झाला होता व्हिडिओ व्हायरल उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना काळात दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात भरणे हे आपल्या मतदारसंघातील एका गावात सुरपाट्या खेळताना दिसून आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, बालपण जगायला मिळणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. हा मोह मलापण आवरला नाही. त्यामुळे मी कोरोनाच्या तणावाच्या वातारणात काम करत असताना निमगाव केतकी येथे सुरपाट्या खेळण्याचा आनंद घेतला. हा आनंद मला महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा बघायचा आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article