खचलेलो नाही; पुढच्या काळात ताकदीने लढणार:काँग्रेसचे भालके यांनी व्यक्त केला विश्वास
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारतो, ही निवडणूक धनशक्तींविरुद्ध जनशक्ती अशी होती, जनशक्तीला हरवून धनशक्ती जिंकली. माझी लढत चुकीचे सरकार आणि चुकीचा उमेदवार यांच्याशी होती. तरीही मला मात्र १ लाख १६ हजार मते मिळाली, काही लोक म्हणत होते की भालके संपले, त्यांच्या मागे लोक नाहीत अशा हवेत गोळ्या मारीत होते. प्रत्यक्षात पोट निवडणुकीपेक्षा ११ हजार मते अधिक मिळाली, असे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भालके यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भालके म्हणाले कि, पोटनिवडणुकीनंतर विठ्ठल ची जबाबदारी असल्याने मी काही काळ जनतेपासून दूर होतो, मात्र त्यानंतरही मी मतदार संघात लोकांच्या संपर्कात होतो. रिक्षा चालक, टांगा चालक असो की सामान्य खोके धारक, व्यापारी यांच्यासोबत पुढच्या काळात मी असेन. लढणे हे रक्तात आहे, मी लढत राहीन, जनतेचे पाठबळ माझ्या मागे आहे त्यामुळे मी समर्थ आहे. विधानसभा निवडणुकीत खासदार प्रणिती ताई सोडता कुणीही माझ्या पाठीशी नव्हते, मात्र सामान्य मतदार माझ्या पाठीशी होते, परिचारक आणि आ. आवताडे यांच्याविषयी बोलताना भालके म्हणाले कि, ज्यानी मापे काढली, टीका केली त्यांचे पाय धरण्याची वेळ आली, विकास कामे केली होती तर साड्या वाटायची वेळ का आली ? असा सवाल करून साडे तीन वर्षे भोगले आहे, आजपासून पुढची पाच वर्षे भोगायला लागेल त्यासाठी त्यानी तयार राहावे, असा इशाराही दिला. . पंढरपूर नगर पालिका निवडणुकीत उतरणार पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार आहे, पालिकेत अध्यक्ष नाही, नगरसेवक नाहीत, प्रशासनाच्या कारभारात सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतोय, शहराची दयनीय अवस्था आहे.आम्ही शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेउन त्याच ताकदीने लढणार आहे, असेही भालके यावेळी म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)