उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील खोदकामातून जे समोर आले, ते पाहून काहींना सुखद धक्का बसला तर काहींनी थेट हातच जोडले. येथील खाटू श्याम मंदिरात खोदकाम सुरू होते. तेव्हा जमिनीतून आवाज आला. कुदळी आणि फावड्याला काही तरी अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यावर हळूहळू खोदकाम करण्यात आले. त्यानंतर अजून उत्सुकता ताणल्या गेली. सिंगाही खूर्द येथे श्री बालाजी मंदिरात खाटू श्याम आणि हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार होती. त्यावेळी खोदकाम करण्यात येत होते. त्यावेळी खोदकामात एक बंद डब्बा सापडला.
पितळी डब्बा काढला बाहेर
खोदकाम दरम्यान एक पितळेचा डब्बा बाहेर काढण्यात आला. या डब्ब्यात काय म्हणून एकच गोंधळ उडाला. डब्बा उघडण्यात आला. त्यामध्ये पितळेचे राम पंचायतन, हनुमान यांच्यासह देवी-देवतांच्या मूर्ती काही नाणी सापडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पितळेचा डब्बा उघडताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. डब्बा उघडला जाताच, अनेक गोष्टी समोर आल्या. राम पंचायतन आणि इतर देवता पाहताच अनेकांनी हात जोडले. काहींनी भक्ती भावाने डोके टेकवले. यावेळी जयजयकार सुद्धा झाला. या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार होती. त्यासाठी जागेची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी मंदिरासाठी पायाचे खोदकाम करण्यात येत होते. त्याचवेळी आवाज ऐकू आला. कुदळी आणि फावड्याला काही तरी अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यावर हळूहळू खोदकाम करण्यात आले. ही माहिती मिळताच पोलीस पण दाखल झाले. मंदिराच्या पुजाऱ्याने पोलिसांकडे हा पितळेचा डब्बा सोपवला.
हे सुद्धा वाचा
बॉक्समध्ये राम पंचायतन
पितळेचा डब्बा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्यात श्री राम पंचायतन, लक्ष्मी, गणेश, दुर्गा देवीची मूर्ती दिसली. एक त्रिशूल, बालाजीची चांदीची मूर्ती, पाच गदा, पाच शालीग्राम, 1920 आणि 1940 मधील काही शिक्के मिळाले. हे वृत्त सगळीकडे पसरले. त्यामुळे मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. पोलिसांनी पोहचताच तात्काळ मूर्ती आणि शिक्के ताब्यात घेतली.