खात्यातून पैसे परत जाण्याची अफवा, लाडक्या बहिणींची सर्वच बँकांत गर्दी:तासन् तास महिला रांगेत, प्रशासन म्हणतंय, पैसे परत जाणार नाहीत‎

2 hours ago 1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आलेले पैसे परत जाण्याची अफवा आहे. त्यामुळे बँक खात्यातील पैसे काढून घेण्यासाठी महिला सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. एकाच खिडकीवरून महिलांना पैसे दिले जात असल्याने मोठी रांग लागत आहे. त्यामुळे महिलांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, पैसे परत जाणार नाहीत, सवडीने कधीही काढा, बँकांत गर्दी करून नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोलापूर जिल्ह्यात १० लाख ३५ हजार महिला या योजनेत पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी केवायसी पूर्ण असलेल्या ७ लाखांहून अधिक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे योजनेतून पैसे जमा होत आहेत. ऑगस्टपासूनचे दरमहा १५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा होत आहेत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. बँकेतील पैसे नाही काढले तर सरकारकडे परत जातील, अशी भिती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे महिला खात्यातील पैसे काढून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. त्यानंतर दिवाळी सुरू होणार आहे. त्याही पार्श्वभूमीवर पैसे काढण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. ^बँकेतील पैसे काढून घ्या, नाहीतर खात्यावरील पैसे सरकार परत घेईल, असे महिलांकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच पैसे काढण्यासाठी १२ वाजल्यापासून बँकेसमोर रांगेत उभी आहे. पैसे घेऊनच घरी जाणार आहे.’’ महानंदा गुरव, लाभार्थी ^एकदा बँकेच्या खात्यावर आलेले पैसे परत जात नसतात. ते तसेच त्यांच्या बँक खात्यात राहतात. महिलांनी अफवांना बळी पडू नये, एकाचवेळी बँकेत गर्दी न करता सवडीने कधीही पैसे काढता येतील. शिवाय पैसे काढण्यासाठी एटीएमसह डिजिटल प्रणालीचाही वापर करता येईल.’’ राम वाखरडे, व्यवस्थापक, अग्रणी बँक

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article