पंतप्रधान केवळ विदेश दौरे अन् प्रचार करत फिरतात:एकनाथ शिंदेंनी भाजपच्या हरियाणा निवडणुकीचा खर्च उचलला - संजय राऊत

2 hours ago 1
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनच कामे आहेत, त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात, ते विदेशात नसतात तेव्हा देशात प्रचारात गुंतलेले असतात, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. सत्ताधारी पक्षच आता निवडणूक आयोग चालवत आहेत, तेच निवडणुकीच्या तारखा ठरवत आहे असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र आणि झारखंड यांच्या निवडणुका हरियाणासोबत व्हायला हव्या होत्या. पण सत्ताधारी पक्ष अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी वेळ नसल्याने भाजपच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलल्या असतील असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. EVM कुठे दाबून ठेवले हे तपासावे लागणार संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, दोन-चार दिवसात जर आचारसंहिता लागणार हे सत्ताधारी सांगत असतील, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. भाजपवाले सांगतील तसेच होणार आहे, आमची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. फक्त EVM कुठे दाबून ठेवले आहेत बंद दाराआड त्यांच्यामध्ये माय घातले जात आहे हे आम्हाला तपासावे लागेल असेही राऊतांनी म्हटले आहे. शिंदे दिल्लीत सर्वाधिक पैसा देतात संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळात वाद ह्या बातम्यामध्ये बोलणे योग्य नाही. पण महायुतीमध्ये कधीच आलबेल नव्हते. फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हे सरकार बनवले गेले. देवेंद्र फडणवीस यांना महायुतीमध्ये कुणी विचारत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी काँग्रेसचे एक नेते होते एस.पी. पाटील त्यांची ख्याती होती की ते मुंबईतून दिल्लीला सर्वात जास्त पैसा देत होते. याचा रेकॉर्ड शिंदेंनी तोडला आहे. त्यामुळे अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या प्रेमात पडले आहे असे दिसतंय पण हे प्रेम नाही अफेर आहे ते कधीही तुटू शकते असा टोला राऊतांनी लगावलाय. हरियाणा निवडणुकीचा खर्च सीएम शिंदेंनी केला संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहिण योजना ही राजकीय प्रेरित आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात, त्यांनी झारखंडमध्ये ही योजना राजकीय प्रेरित आहे असे म्हणत असतील तर तो न्याय महाराष्ट्रालाही लागू करायला हवा. अमित शहा यांना मराठी माणूस कमजोर करायचा आहे. 40 टक्के कमीशन खाणारे हे लोक आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांच्यात पटत नाहीये, हरियाणा निवडणुकीचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला असा आरोपही त्यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article