खासदार सुळेंसमोर मांडली व्यथा , डायसवरून उतरत जाणल्या समस्या, मंगळवेढ्यातील मतदारांनी सभेत दूध दर, पाण्याचा प्रश्न‎

2 hours ago 1
मंगळवेढा मंगळवेढ्यातील सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना दुधाला दर मिळत नाही, असे म्हणत जागेवरून उठून अचानक मंचाजवळ आलेल्या भारत माळी यांनी प्रश्न मांडला. माळी यांनी दुधाला २४ रुपये दर तर पाण्याच्या बाटलीला २० रुपये दर आहे, अशी खंत व्यक्त केली. नाथपंथी डवरी समाजाचे जेष्ठ नागरिकांनी समाजाच्या प्रलंबित मागण्याची सोडवणूक करण्यासाठी विनंती केली. सुप्रिया सुळे यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सिकंदर शेख हे भावनिक होऊन रडत स्टेजजवळ आले. आमचा समाज भेदरलेल्या अवस्थेत असून, समाजाला न्याय मिळत नाही, अशी भावना व्यक्त केली. त्यावर सिकंदर शेख यांचा हात हातात घेऊन सुप्रिया सुळे यांनी तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, मी तुमची लेक म्हणून शब्द देते, यापुढे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. कोणतेही संकट येऊ द्या, मला थेट फोन करा, असे सांगून आपण रडू नका सिकंदर हे लढणारे होते, असे सांगितल्यानंतर व कोणताही समाज असुरक्षित दिसणार नाही, असे आश्वासित केले. लवंगी येथील संग्राम माने यांनी पाण्याचा प्रश्न मांडला. या देशात सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मिळाला. परंतु पवार साहेब हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी अगोदर सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे सोलापूरकरांशी आमचे नाते अधिक घट्ट आहे. सोलापूरकडे माझी ओढ जास्त आहे, त्याचे कारण असे की पवार साहेबांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी सोलापूरकरांनी त्यांना गुंजभर जास्तच प्रेम दिले आहे. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या अंथरून त्यांचे सोलापूरकरांनी स्वागत केले होते, हे मी अजिबात विसरणार नाही. आता मीच फोटो काढते अन् करेक्ट कार्यक्रम करते या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला तुम्ही धडा शिकवल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. तुम्ही महाराष्ट्रातील लेकींना दीड हजार रुपये देता आणि कोल्हापूरचे भाजपचे खासदार म्हणतात जर तुम्ही विरोधकांच्या सभेत दिसला तर तुमचे फोटो काढून टाका, तुमचे दीड हजार रुपये बंद करू, आता मीच तुझा फोटो काढते आणि मीच तुझा कार्यक्रम करते, असा परकड दम जाहीर सभेत सुप्रिया सुळे यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतनाना देशमुख, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रणदिवे आदी जण उपस्थित होते. . माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी अवैध धंद्याबद्दल तक्रारी केल्या. आवाज उठवला आणि आता मात्र अधिकाऱ्यानी खुलेआम धंदे सुरू केले आहेत. यांची अधिकाऱ्यासोबत बैठक झाली की अधिकारी यांना जुमानत नाहीत, याची आमदाराने प्रामाणिकपणे जनतेसमोर कबुली द्यावी.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article