गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन जनतेने फेटाळले:उद्धव ठाकरेंच्या 50 खोकेंच्या आरोपाला लोक कंटाळले

2 hours ago 1
गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत करत होते. मात्र त्यांचे हे आवाहन मराठी मतदारांनी फेटाळून लावल्याचे स्पष्ट झाले. पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह लोकसभेसारखीही कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईडीचा त्रास नाकारला ईडी, सीबीआयचा गैरवापर होतोय हा उद्धव ठाकरेंचा मुद्दाही जनतेला पटला नाही. लाट ओसरत होती लोकसभेच्या वेळी असलेली सहानुभूतीची लाट ओसरत होती. ती उद्धवांना दिसलीच नाही. पुढे काय? केंद्रात आणि राज्यातील सत्तेत सहभाग नाही. पुरेसे आमदारही निवडून आलेले नाही. त्यामुळे उद्धवसेनेला अस्तित्व राखण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागणार आहे. ५० खोकेंच्या आरोपाला लोक कंटाळले शिंदेसेनेविरुद्ध ५० खोकेंच्या आरोपाला लोक कंटाळले होते. ते नव्या आक्रमक आरोपाच्या प्रतीक्षेत होते. संजय राऊतांचा भोंगा खा. संजय राऊत खालच्या स्तरावरील टीका करत होते. ती लोकांना आवडली नाही. एकनाथ शिंदेंना कमी लेखले प्रभावी वक्तृत्व नसलेल्या एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कमी लेखणे भोवले. ‘बटेंगे’च्या प्रभावाकडे दुर्लक्ष ‘बटंेगे तो कटंेगे’ ही हिंदू मतदारांना प्रभावित करणारी घोषणा होती. त्याकडे उद्धवसेनेने दुर्लक्ष केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article