ग्राम सुरक्षा दलामुळे घोडेगावात दीड महिन्यात चोरी नाही:सोशल मीडियाचा विधायक वापर, आतापर्यंत 5 संशयित पोलिसांच्या हवाली
2 hours ago
1
सोशल मीडियाचा विधायक वापर केल्यास चोऱ्या रोखता येतात, हे नेवासे तालुक्यातील घोडेगावच्या युवकांनी दाखवून दिले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी गावात एकाच रात्री ५ ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या, एका महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले. त्यांनतर गावातील सुमारे १ हजार युवकांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करत रात्रभर पहारा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील दोन महिन्यात गावात एकही चोरी झालेली नाही. गौरींना निरोप देण्याच्या दिवशी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूमस्टाईल चोरी गेले. पुढच्याच आठवड्यात गावातील मध्यवस्तीत ५ ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊनही अद्याप आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे गावातील युवकांनी पुढाकार घेत सोशल मिडियावर ग्राम सुरक्षा दलाचा ग्रुप सुरु केला. त्या माध्यमातून दररोज रात्री आळीपाळीने गावात पहारा देण्याचे काम सुरु केले. चौकाचौकात युवक रात्री जागे राहून पहारा देतात. त्यामुळे चोऱ्या बंद झाल्या आहेत. गावातील मळ्यात, वस्त्यांवर रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली जाणवल्या, चोरट्यांची चाहूल लागली की ग्राम सुरक्षा दलास कळवले जाते. त्यामुळे पहारा देणारे युवक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होतात. आतापर्यंत ४–५ वेळा चोरट्यांना पळवून लावण्यात यश आले आहे. सुरक्षा दलाच्या ग्रुपवर रात्री दर ४ तासांनी कोण-कोण जागे आहे, याची हजेरी घेतली जाते. युवकांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. ५ संशयित पकडले ग्राम सुरक्षा दलास माहिती मिळताच सतर्कतेने युवक घटनास्थळी जातात. वाड्या-वस्त्यांवर, गावात संशयास्पदरित्या फिरणारे ५ हून अधिक संशयित आतापर्यंत पकडले. चौकशी करुन त्यांना पोलिसांच्या हवाली केले. एक हरवलेली मोटारसायकल शोधली. - अंकुश कदम , अॅडमिन.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)