चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कोतवाल आक्रमक:कोतवाल संघटनेची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

2 hours ago 1
कोतवाल संवर्गास चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन करण्यात आले. कोतवाल संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. या निवेदनानुसार मंत्रालय स्तरावर कोतवाल संवर्गाची चतुर्थश्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांविषयी मंत्रालयस्तरावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. ही मागणी ती जलद गतीने पूर्ण होऊन अन्य मागण्याही पूर्ण व्हाव्यात, याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे लक्षवेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रणजीत सोळंके, विवेक देशमुख, अकोला तालुकाध्यक्ष कुणाल सिरसाट, योगेश किरडे, नारायण मानकर, रवी राजे आदी सहभागी झाले. कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, अशी खूप जुनी मागणी आहे. प्रत्येक पदाचे वेगळे महत्व असते; मात्र मानधनावर काम करणाऱ्या पदांमध्ये कोतवाल व इतर पदे यांच्या कामाच्या जबाबदाऱ्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करून देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो. निवडणूक प्रक्रियेच्या कामामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. तसेच महसूल प्रशासनात स्थानिक, क्षेत्रीय पातळीवरील नियमित कामे करतो. त्यामुळे या बाबींचा विचार होणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे. पालकमंत्र्यांनाही दिले निवेदन कोतवाल संघटनेतर्फे गत आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देणे, पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मागण्या लवकरात लवकर शासनातर्फे पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही संघटनेला देण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article