वीस टक्के अपघात कमीFile Photo
Published on
:
15 Nov 2024, 11:20 am
Updated on
:
15 Nov 2024, 11:20 am
राहुल हातोले
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या यशस्वी जनजागृती उपक्रमामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गंभीर अपघातांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत गंभीर अपघातांचे प्रमाण घटले आहे. आरटीओ पथकाच्या जनजागृतीमुळे मागील वर्षीचा आढावा घेता, वीस टक्के अपघात कमी झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
आरटीओ कार्यालयाच्या बरोबरीला त्यांच्या समुपदेशन विभागाद्वारे चालकांचे सुरू केलेल्या समुपदेशनामुळे अपघातांची संख्या कमी झाली. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातांमुळे होणार्या मृत्युंची संख्यादेखील यावर्षी घटल्याचे जानेवारी ते सप्टेंबर महिन्यातील अपघातांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
यावर्षी जुलै महिन्यात द्रुतगतीवर बसविलेल्या आधुनिक वाहतूक व्यवस्था प्रणाली कार्यान्वयित झाली आहे. महामार्गावर एआय प्रणाली वापरून बसविलेल्या कॅमेराद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त चालकांना दंड बसत असून, वाहतूक सुरळीत होत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली असून, अपघातांची संख्या कमी झाली आहे.
एप्रिल महिन्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची संख्या दिसून आली आहे. तसेच याच महिन्यात मृत्युच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
आरटीओची पथके चोवीस तास द्रृतगतीवर कार्यरत असून, दोन समुपदेशन केंद्राची देखील उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटली.