Published on
:
22 Jan 2025, 3:07 pm
Updated on
:
22 Jan 2025, 3:07 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगाव येथील रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी रेल्वेत उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी रामरंग पाशी याने ही घटना कशी घडली याबाबत सविस्तर सांगितले आहे.
रामरंग पाशी हा 23 वर्षीय प्रवाशी लखनऊचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की रेल्वेच्या खाली आग लागली होती. लोक ओरडू लागल्यानंतर चेन ओढण्यात आली गाडी थांबली. त्याचेवेळी लोक पटापट खाली उतरु लागले. अगदी त्याचवेळेस रेल्वे लाईन क्रॉस करीत असताना बाजूच्या रुळावरुन गाडी आली व ती प्रवाशांना चिरडत निघून गेली.
अगदी क्षणात होत्याचे नव्हते झाले. रेल्वे खाली आलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत यामध्ये लच्छिराम पाशी हे त्याचे काका मयत झालेले आहे. तो लखनऊचा राहणार असून कामासाठी कल्याण येथे जात होता. त्याच्याबरोबर सहा जण होते अशी माहिती त्यांनी दिली.