चौथ्या आणि पाचव्या माळेला रेणुका माता चरणी हजारो भाविक नतमस्तक:दिर गाभारा आकर्षक फुलांची सजावट, 1500 भाविक बसले घटी

2 hours ago 1
रेणुका मातेच्या दर्शनासाठी रविवारी व सोमवारी चौथ्या व पाचव्या माळेचे औचित्य साधून दोन दिवसांत हजारो भाविक श्री रेणुकेच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी ‘श्री रेणुकामाता की जय’, ‘अंबे माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सोमवारी (दि. ७) पहाटे महाअभिषेक, महाआरती, पूजा करून रेणुकादेवीला सफेद रंगाची पैठणी नेसवून आभूषणे चढविण्यात आली. श्री रेणुकादेवी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवून सभामंडपातही फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री रेणुकेचे विलोभनीय रूप डोळ्यांत साठवून घेण्यासाठी भाविकांनी रविवारी सुटीचे व सोमवारी पाचव्या माळेचे औचित्य साधून दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. महिला व भाविकांना घटी बसण्यासाठी ६ भक्तनिवास व सभागृहांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे १५०० भाविक घटी बसल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन व पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवरात्रौत्सव यशस्वितेसाठी संस्थानचे व्यवस्थापक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष पवार, विलास पवार, विजय जोशी, हरेंद्र वैद्य परिश्रम घेत आहेत. चौधरी फाउंडेशनतर्फे भाविकांना सेवा सुविधा भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी स्वतंत्र मदत केंद्र उभारून सामाजिक उपक्रम व विविध मोफत सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या. याअंतर्गत साडेबारा हजार फुटांचा दर्शन रांग मंडप, प्रसाद खिचडी व पिण्याचे पाणी वाटप, सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी केंद्र, भाविकांसाठी निवारा, स्तनदा मातांसाठी बंदिस्त हिरकणी कक्ष, वैद्यकीय मदत केंद्र, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबिर, भजन-भारुड, सांस्कृतिक कार्यक्रम आदी सेवासुविधा भाविकांना उपलब्ध देण्यात आल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article