छगन भुजबळ यांच्या निवडीला आव्हान:येवला मतदारसंघात 24 फेब्रुवारीला होणार टेस्ट व्होटिंग, शरद पवार गटाने दिले होते आव्हान

2 hours ago 1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर येत्या 24 फेब्रुवारी रोजी टेस्ट व्होटिंग होणार आहे. त्यामुळे भुजबळांना एका नव्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांचा विजय झाला होता. त्यांच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. त्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या मागणीनुसार येत्या 24 फेब्रुवारी रोजी येवला मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रावर मॉकपोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येवला मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. अतितटीच्या लढतीत भुजबळांचा झाला होता विजय उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला होता. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात रान पेटवले होते. त्यातच शरद पवारांनीही मतदारांना भुजबळांना पाडण्याचे आवाहन केले होते. यामुळे भुजबळ हरणार की जिंकणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर अतितटीच्या लढतीत भुजबळ यांचा विजय झाला. छगन भुजबळ यांना 1,35,023 मते मिळाली, तर शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना 1,08, 623 मते मिळाली. त्यानंतर शिंदे यांनी निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार आता येवला मतदारसंघात भुजबळांना मतदानाच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. भुजबळ सध्या अजित पवारांवर नाराज दुसरीकडे, छगन भुजबळ सध्या राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे चांगलेच नाराज झालेत. या प्रकरणी त्यांचा पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वाद सुरू आहे. त्यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचेही संकेत दिलेत. त्यातच निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघात मॉकपोल घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. हे ही वाचा... नामदेवशास्त्रींनी राजकारणात न पडण्याचा पायंडा मोडला का?:पंकजा मुंडेंसोबतच्या वादात गडावर राजकारण न करण्याची घेतली होती भूमिका बीड - भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन गडाची पर्यायाने वंजारी समाजाची ताकद भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी केली आहे. शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या कथित वादात गडावरून राजकारण न करण्याची भूमिका घेतली होती. पण आता त्यांनीच धनंजय यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी राजकीय वादात न पडण्याचा आपला पायंडा मोडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article