"छात्र तरंग' युवा महोत्सवात 27 कलाविष्काराचे दर्शन, 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजन; 5 जिल्ह्यातील 203 महाविद्यालयांचा समावेश‎

2 hours ago 1
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने "छात्र तरंग' युवा महोत्सव २०२४-२५ चे आयोजन अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवात अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला या पाच जिल्ह्यांमधील २०३ महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी दररोज सहभाग घेणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, प्रभारी कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. ताराताई हातवळणे उपस्थित राहणार आहेत. युवा महोत्सवाचा समारोप कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी नीलेश जळमकर, अंकुर वाढवे, आ. वसंत खंडेलवाल, अॅड. गिरीश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अकोल्यात होणाऱ्या या युवा महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, प्राचार्य जगदीश साबू, डॉ. राजीव बोरकर, संचालक विद्यार्थी विकास डॉ. ज्ञानसागर भोकरे, प्रा. सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे, अरुण शेळके यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान खुले रंगमंच, भिकमचंद विद्यालय, पद्मानंद सभागृह, मदनलाल खंडेलवाल सभागृह, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल, अॅड. दादा देशपांडे सभागृह, वसंत सभागृह, भाऊसाहेब गोडबोले सभागृह या ठिकाणी लोक व आदिवासी नृत्य, लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, समूहगान, एकांकिका, प्रहसन, मूकनाट्य, शास्त्रीय गायन, भारतीय समूहगान, नकला, प्रश्नमंजुषा, चिकटकला, स्थळ छायाचित्रण, सुगम संगीत, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,पोस्टर मेकींग, व्यंगचित्रे, मातीकला, रांगोळी, स्थापना, मेहंदी आदी २७ कलाप्रकार सादर होणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article