जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी

1 day ago 1

स्पॅम कॉलचे प्रमाण घटले

स्पॅम कॉल्स आणि एसएमएसने ग्राहक त्रस्त आहेत. स्पॅम कॉल्सना आळा घालण्यासाठी ट्रायकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना थोडेफार यश येतंय असे नव्या आकडेवारीवरून दिसून येतंय. ट्रायच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये स्पॅम कॉल्स आणि एसएमएसविरोधात 1.51 लाख तक्रारी होत्या. सप्टेंबरमध्ये हा आकडा 1.63 लाख होता. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये स्पॅम कॉल्सच्या तक्रारी 13 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येतंय. दूरसंचार नियामक मंडळाने 13 ऑगस्ट रोजी निर्देश जारी केले होते. जर कुणी नियमांचे उल्लंघन करत प्रमोशनल व्हॉईस कॉल करत असेल तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ट्रायने दिलाय. त्यांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

गटई कामगाराचा ‘राजेशाही थाट’

मुंबईत सध्या पहाटे थोडासा गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी मात्र चांगलाच उन्हाचा तडाखा बसत आहे. रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईत एका गटई कामगाराने चक्क ‘राजेशाही छत्री’चा सहारा घेतला आहे. मोठमोठय़ा लग्नकार्यात दिसणारी राजेशाही छत्री रस्त्याच्या कडेला दिसत असल्याने रस्त्यांवरून ये-जा करणाऱया अनेकांसाठी आकर्षण ठरत आहे. (छायाः सचिन वैद्य)

रेल्वे सुविधेसाठी ठेकेदाराला 5.60 कोटींचा दंड

देशात रेल्वेने दररोज कोटय़वधी प्रवाशी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष न देणाऱया ठेकेदारांना दंड करणे सुरू केले आहे. रेल्वेला एकूण 5.60 कोटी रुपये दंड मिळणार आहे. रेल्वेकडून होणाऱया या धडक कारवाईमुळे प्रवाशांना मिळणऱया सुविधेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना खराब जेवण, कोच टॉयलेटमध्ये घाण असणे, पाणी नसणे, खराब मोबाइल चार्ंजग, खराब बेडरोल, खराब एसी, खराब लाईट अशा तक्रारी प्रवाशांकडून आल्या होत्या. प्रवाशांनी तक्रारीसंबंधी फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले आहेत. तसेच रेल मदत या बेबसाईट आणि
ऍपवरसुद्धा तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत रेल्वेने ठेकेदारांना दंड ठोठावला आहे. मागील सहा महिन्यात रेल्वेने ठेकेदारांकडून एकूण 5.60 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

‘तेजस’ फायटर जेटमुळे पाकिस्तानची उडाली झोप

हिंदुस्थानी वायुदलाच्या ‘तेजस’ फायटर जेटमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. ‘तेजस’ला टक्कर द्यायला पाकिस्तान आता चीनच्या मदतीने नव्या फायटर जेटची निर्मिती करत आहे. या फायटर जेटचे नाव ‘पीएफएक्स’ असून ते ‘जेएफ- 17’ विमानापेक्षा अद्ययावत आहे. हिंदुस्थानच्या ‘तेजस’ला टक्कर देण्यास पीएफएक्स सक्षम असल्याचा दावा पाकिस्तानने केला. सध्या कराचीमध्ये तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानात डिफेन्स एक्स्पो सुरू आहे. त्यामध्ये पाकिस्तानी वायुदलाने नव्या फायटर जेटची घोषणा केली.

ओला इलेक्ट्रिकमधून 900 कर्मचाऱयांची कपात

ओला इलेक्ट्रिक शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 900 कर्मचाऱयांची कपात केली आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संगठनमध्ये (ईपीएफओ) कंपनीने जी फायलिंग केली, त्यातून ही माहिती समोर आली आहे. कर्मचारी कपातीनंतर कंपनीत आता एकूण कर्मचाऱयांची संख्या 3754 इतकी राहिली आहे. याआधी कंपनीत 4665 कर्मचारी संख्या होती. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी तोटय़ात आहे.

नोकरी! आयआयटी मुंबईत भरती

आयआयटी मुंबईत तांत्रिक अधीक्षक, तांत्रिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांसाठी किमान वय 27 ते 40 असायला हवे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट iitb.ac.in वर देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये पगार मिळणार आहे.

आयटीपीबीमध्ये नोकरीची संधी

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती सुरू आहे. पात्र उमेदवारांना 14 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. हेड
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 383 जागांवर भरती केली जाणार आहे. कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article