जगातील सर्वात मोठे विमानतळPudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 11:43 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:43 pm
रियाध : जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरेबियाच्या दम्मम शहराजवळ आहे. त्याचे नाव आहे ‘किंग फहद इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे आहे. हे विमानतळ मुंबई शहरापेक्षाही मोठ्या आकाराचे असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 7 लाख 80 हजार चौरस मीटर इतके आहे.
किंग फहद एअरपोर्ट सौदी अरेबियाच्या पूर्व भागात आहे. 1999 मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते. या विमानतळावरून रोज सुमारे 1 कोटी प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या हिशेबाने हे जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे हे एक मुख्य केंद्र बनलेले आहे. या विमानतळाचा आकार इतका मोठा आहे की ते मुंबई महानगरीपेक्षाही मोठे आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 603 चौरस किलोमीटर आहे तर या विमानतळाचे क्षेत्रफळ 780 चौरस किलोमीटर आहे. हे विमानतळ केवळ आकारानेच मोठे आहे असे नाही. तिथे अनेक अद्ययावत सुखसुविधाही आहेत. या विमानतळावरून जगभरातील मोठ्या शहरांकडे विमानांचे उड्डाण होत असते. सौदी अरेबियाच्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी केंद्रांपैकी हे एक आहे. सौदी अरेबियाचे राजे फहद बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्यावरून या विमानतळाचे नाव ठेवले आहे. याठिकाणी चार रनवे, दोन टर्मिनल आणि अनेक पार्किंग क्षेत्र आहेत. हे विमानतळ दरवर्षी 1 लाख 25 हजार टन कार्गो हँडल करते. याठिकाणी अनेक शॉपिंग मॉल्स, फूड कोर्ट, हॉटेल्स आणि अनेक सुखसुविधा आहेत. या विमानतळाला जगातील एक ‘सिटी एअरपोर्ट’ असेही म्हटले जाते.