जाती-धर्मावर निवडणूक न लढवता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्यास सर्वांगीण विकास:जून 2025 पर्यंत शहराला 24 तास पाणी मिळणार- संजय शिरसाट

2 hours ago 1
नेताजी न्यूजरूममध्ये सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट म्हणाले की, शहराला मोठा राजकीय, सामाजिक वारसा लाभलेला आहे. अनेक दिग्गज मंत्री या ठिकाणाहून घडले आहेत. पर्यटन, उद्योग आदींमुळे जगाच्या नकाशावर शहराचे नाव कोरले गेले. मात्र शहराचा विकास, वाढलेली गुन्हेगारी हे रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारदरबारी प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे. शहरात मोठे उद्यान नाही, त्याची निर्मिती करणे गरजेचे आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आदी कामे करणे ही तर आमदाराची कामे आहेतच, त्याशिवाय उद्योग आणणे, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणेही गरजेचे आहे. जाती-धर्मावर निवडणूक न लढवता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली पाणी योजना अंतिम टप्प्यात अाहे. डिसेंबरमध्ये दिवसाआड पाणी मिळेल तर जून २०२५ मध्ये शहरवासीयांना २४ तास पाणी मिळेल, असे आश्वासन संजय शिरसाट यांनी दिले. राहुल बोधनकर प्रश्न - पर्यटन राजधानी असून या ठिकाणी मोठे उद्यान नाही, उद्योग आणण्यासाठी काय प्रयत्न करणार? शिरसाट : शहरामध्ये सिद्धार्थ उद्यान वगळता अन्य कोणतेही मोठे उद्यान नाही. त्यामुळे लवकरच सर्व सुविधा असलेले रम्य पार्क मी उभारणार आहे. सफारी पार्कचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. चेतन राऊत, अध्यक्ष, मसिआ डीएमआयसीमध्ये लहान प्लॉट नाही, एमआयडीसीचा विस्तारही रखडला आहे, त्यासाठी काय करणार ? शिरसाट : लघुउद्योग चालण्यासाठी मोठ्या उद्योगांची गरज आहे. त्यासाठी डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग यावे म्हणून त्यांच्या सोयीनुसार प्लॉटिंग करण्यात आली होती. उद्योगदेखील आणले आहेत, आता लहान उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुकाराम देशमुख शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे त्याचा त्रास ५० हजार नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी पूर्ण होणार? शिरसाट : रेल्वे आणि मनपाच्या वेळखाऊ धोरणामुळे वेळ लागला हे खरे आहे. त्यात पावसामुळे मागील काही दिवस काम बंद होते. आता काम सुरू झाले असून येत्या काही दिवसांत काम पूर्ण होईल. डॉ. किशोर पाठक छावणी नाका, देवगिरी किल्ला विकासासाठी का प्रयत्न केले नाहीत, पुढे काय करणार आहात ? शिरसाट : धुळे-सोलापूर रस्ता केला, गोलवाडीच्या रस्त्याचे रुंदीकरण केले. यामुळे अपघात कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात पडेगाव-मिटमिटा हा रस्तादेखील २०० कोटी रुपये खर्चून चारपदरी करत आहोत. विशेष म्हणजे या रस्त्यावरील झाडांचे पुनर्रोपण करणार आहोत. दत्तात्रय वर्पे झोपडपट्टी परिसराचा विकास कधी करणार आहात ? गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात ? शिरसाट : पश्चिम मतदारसंघातील सर्वच भागात २ हजार कोटी रुपये खर्च करून विकासाची कामे करण्यात आली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. डॉ. नामदेव पाटील शहरामध्ये आता आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे, नियमित पाणी कधी मिळणार ? शिरसाट : सरकारने २७४० कोटी रुपये खर्च करून पाणी योजना आणली आहे. त्यासाठी राज्य सरकाने ८२२ कोटींचे सॉफ्टलोनदेखील दिले आहे. या योजनेचा उच्च न्यायालय नियमित आढावा घेत असल्याने कामाची गती वाढली आहे. जून २०२५ पर्यंत शहराला २४ तास पाणी मिळेल. अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष, मसिआ एमआयडीसी परिसरातील हप्तेखोरी व गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करणार आहात? स्वतंत्र पोलिस ठाण्याचे काय झाले? शिरसाट : चिकलठाणा व पैठण एमआयडीसी हप्तेखोरी व गुन्हेगारीमुळे बंद पडली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्योजकांना संरक्षण देणे आमचे कर्तव्य असून लवकरच उद्योजकांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात शहरातील जालना रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय करणार? अखंड उड्डाणपुलाचे काय झाले? शिरसाट : खासदार डॉ. भागवत कराड यांनी साडेसात कोटी रुपये खर्च करून अखंड उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. मात्र आता रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शब्द दिला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल. पूल झाल्यास वाहतूक कोंडी संपेल. पर्यटन वाढीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? शिरसाट : छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी वेरूळ-अजिंठासारख्या जगप्रसिद्ध लेणी आहेत. मात्र या ठिकाणी राहण्याची सोय नाही. ती मी सर्वप्रथम करेन. सोबतच मोठे गार्डनदेखील विकसित करणार आहे. पुढील पंचवार्षिकमध्ये हा सगळा विकास करणे शक्य होणार आहे. एकूणच सरकारमध्ये राहून या गोष्टी करणे शक्य असून पुन्हा एकदा जनता महायुतीचे सरकार निवडून देईन. सातारा-देवळाई, मिटमिटा, पडेगाव भागात अद्यापही अनेक मूलभूत सुविधा का मिळाल्या नाहीत ? शिरसाट : २७५ कोटी रुपये खर्च करून सातारा-देवळाईमध्ये ड्रेनेजलाइनचे काम सुरू आहे. पाण्याची लाइनदेखील टाकली आहे. बहुतांश रस्त्यांची कामे झाली असून काही ठिकाणी लाइन टाकण्याचे काम बाकी असल्याने रस्त्याची कामे झाली नाहीत. लवकरच ती मार्गी लागतील. येत्या काळात हा परिसर नंदनवन बनवून जाईल यात शंका नसणार. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात ? शिरसाट : विमानतळ विस्तारीकरणासाठी मी प्रयत्न करत आहे. असे झाल्यास नाइट पार्किंगची सोय आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानेदेखील या ठिकाणाहून उड्डाणे घेतील. यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असूून, तशी प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. आगामी काळात विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा निकाली लागणार आहे. यामुळे कुणालाही त्रास होणार नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article