राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. मतदानानंतर हा अहवाल येणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार
आढळून आले आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. मतदानानंतर हा अहवाल येणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.