पेण | मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीच्या पुढे गांधे फाट्या (आमटेम) गावानजिक तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणार्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली पलटी होऊन अपघात झाल्याची घटना 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून यात 26 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोकणातील तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणार्या बसवरील चालक विनोद हळदणकर हा त्याच्या ताब्यात असणारी बस घेवुन मुंबईकडे जात असताना सदर बस रायगड जिल्ह्यातील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीचे पुढे आमटेम गावानजीक आली असता चालक विनोद हळदणकर यास झोपेची डुलकी लागल्याने बस रस्त्याच्या खाली जावून पलटी होऊन अपघात झाला आहे.
यामधील प्रवासी रुपाली सखाराम धुमाल, सखाराम गंगाराम धुमाल, अनिकेत सखाराम धुमाल तिन्ही रा कांजुरमार्ग मुंबई इस्ट, वंदना वसंत खोचाडे, रा. अंधेरी मुंबई, सुमित अनंता बाणे, रा. विरार-मुंबई, समर्थक सचिन जाधव, रा. अंधेरी मुंबई, वसंत तानु खोचोडे, रा. अंधेरी मुंबई, रिहान सिराज पटणी, रा. अंधेरी मुंबई, अनिल सोनी गावकर, रा. नालासोपारा-मुंबई, सत्यवान काशिराम पगारे, रा. वडाळा मुंबई, प्रमोद मधुकर कांबळे, रा वडाळा-मुंबई, प्राजक्ता प्रमोद कांबळे, रा. वडाळा-मुंबई, मयुरेश प्रमोद कांबळे, रा. वडाळा-मुंबई, विनायक आत्माराम घडशी, रा. घाटकोपर-मुंबई, विनोद चंद्रकांत हळदणकर, रा. चांभारभाटीवाडा-सिंधुदुर्ग, मंगेश भगवान नाकटे, रा. घाटकोपर-मुंबई, पुरुषोत्तम गणपत कदम, रा. अंधेरी-मुंबई, संकेत अनिल तारी, बोंडगाव-सिंधुदुर्ग, मनोहर शंकर आंबेरकर, रा. बोरीवली-मुंबई, प्रतिभा कृष्णा यादव, रा. सडेवाल-घोटन रत्नागिरी, अमिता अनंत बाणे, रा. विरार-मुंबई, प्रसाद राजेंद्र हांडे, रा. नालासोपारा-मुंबई, जयश्री जयवंत आंबेरकर, रा. नडगीरे-सिंधुदुर्ग, स्वप्नील संजय यादव, रा. विरार-मुंबई, नकुल रामचंद्र सागवेकर, रा. कांजुरमार्ग-मुंबई, सुनीता सिध्दार्थ कोंडकर, रा. वडाळा मुंबई आदी प्रवाशांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवुन बसचे नुकसान झाले आहे.
रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या अपघातात सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडला नाही. या घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनावळे हे करीत आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.