आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात आला.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 1:50 am
Updated on
:
17 Nov 2024, 1:50 am
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील एका सोशल मीडिया ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर टाकण्यात आला. याबाबत संजयनगर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून ग्रुप अॅडमीनवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश सीताराम आवटी (रा. माधवनगर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत सनोबर दाऊद खान (वय 46, रा. माधवनगर) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपलं माधवनगर या नावाचा व्हॉट्स अप ग्रुप असून त्याचा अॅडमीन राजेश आवटी होता. त्याने 15 रोजी रात्री त्याच्याऐवजी दुसर्यालाच अॅडमीन केले. 14 रोजी रात्री त्याने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर व्हॉट्स अपवर शेअर केला. फिर्यादीने आवटी याच्याशी संपर्क केला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गावातील इतर ग्रुप सदस्यांशी संपर्क करून आक्षेपार्ह मजकुराबाबत माहिती दिली. त्यानंतर संजयनगर पोलिसांत राजेश आवटी याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी आवटीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.