जळका भडंग येथे श्रमदानातून वनराई बंधारा:कृषी विभागाचा उपक्रम; गुराढोरांची तहान भागवण्यासाठी होणार मदत
2 hours ago
2
खामगाव तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून जळका भडंग येथे २६ नोव्हेंबर रोजी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आल्यामुळे आता पुढील काही दिवस गुराढोरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्च असणारा पर्याय म्हणजे वनराई बंधारे बांधण्याचा आहे. पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्यामुळे कमी उताराच्या जागी वाळू, माती, आणि सिमेंटच्या रिकाम्या गोण्या भरून वनराई बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. असे केल्याने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने जमिनीतील भूजल पातळी वाढते. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सिंचन क्षेत्रांमध्ये वाढ होते. तसेच गुरा ढोरांची पुढील अनेक दिवस तहान भागवली जाईल. कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनराई बंधारा बांधण्याच्या उपक्रमांमुळे पाणी जमिनीमध्ये मुरण्यासही मदत होणा आहे. तालुका कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे सुरू झाले आहे. जळका भडंग येथील बंधारा बांधण्याकरता कृषी सहाय्यक पी. बी. गंध्रे, गोपाल बोदळे, रघुनाथ झाडोकार, शांताराम भातखेडे श्रीकांत करणकार, प्रशांत बुंदे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. जळका भडंग येथे श्रमदानातून तयार करण्यात आलेला बंधारा.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)