Published on
:
15 Nov 2024, 4:58 am
Updated on
:
15 Nov 2024, 4:58 am
जळगाव | एरंडोल वरून बाळंतीण महिलेला बाळासह घेऊन जाणारी रुग्णवाहिका आग लागून जळून खाक झाल्यानंतर जिल्हा परिषद व रुग्णवाहिका पुरवणाऱ्या कंपनीला जाग आली आहे. कंपनी आता या घटनेची सर्व चौकशी करीत आहे. मात्र, एकमेकांकडे बोट दाखवल्याशिवाय दुसरे काहीच होताना दिसून येत नाहीये. सदर रुग्णवाहिका ही पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री , मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या कॉन्व्हाय मध्ये या जळालेल्या रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी देखील हे मान्य केले आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे.
108 रुग्णवाहिका ही ग्रामीण व उप रुग्णालयाचे महत्त्वाचे एक रुग्णांसाठी साधन आहे. रुग्णवाहिका ग्रामीण भागातील व दुर्मिळ भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात ने- आणण्यासाठी महत्त्वाचे काम करीत असते. तसेच पंतप्रधान, मंत्री व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या कॉन्व्हाय मध्ये सुद्धा या रुग्णवाहिका आपली भूमिका बजावत असतात.
दि. 13 रोजी रात्री जळगाव शहरातील दादावाडी पुलाजवळ रुग्णवाहिका (क्रमांक एम एच 19 सी एल 0791) अचानक रस्त्यावर जळून खाक झाली. यामध्ये असलेले ऑक्सिजनचे सिलेंडर पडल्यामुळे मोठा स्फोटही झाला. सुदैवाने या रुग्णवाहिकेमधून माता-बाळ व डॉक्टर हे सुखरूप बाहेर पडले. कोणतीही जीवित हानी या आगीत झाली नाही.
मात्र आग लागली कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. या रुग्णवाहिकेचा मेंटेनन्स वेळेवर होत होता की नाही हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. याची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती का? आरटीओ विभाग याची नियमित तपासणी करत होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद चे संजय भांगरे जे 108 रुग्णवाहिकेची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे, त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विनोद चौधरी हे याबाबत अधिक माहिती सांगू शकता.
विनोद चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जी रुग्णवाहिका काल जळून खाक झाली ती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात आपले कर्तव्य बजावत होती मात्र ती कशी जळाली याबाबत आमची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सदरचे अॅबुलन्स या पुणे येथील भारत विकास ग्रुप यांच्याकडून पुण्यात येतात व तेच यांची देखभाल दुरुस्ती करित असतात.
जळगाव जिल्ह्याचे भारत विकास ग्रुपचे मॅनेजर राहुल जैन ची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिक काम पाहून तिचे काम करण्यात येते. तसेच फोर्स मोटर मध्येही त्यांचे काम करण्यात येते. व येथे संपूर्ण माहिती माझ्या सहकार्य असेल असे ते म्हणाले.- भारत विकास
भारत विकास ग्रुपचे सहाय्यक मॅनेजर विनोद चौधरी यांच्याशी संपर्क केला असता अजून प्राथमिक अहवाल आलेला नाही. भारत विकास ग्रुप मार्फत या रुग्णवाहिका चालत असतात व ही रुग्णवाहिका सर्वात चांगली रुग्णवाहिका होती ती महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामध्ये असायची मात्र ती आगीत कशी भस्मसात झाली याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.