मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस File Photo
Published on
:
22 Jan 2025, 2:31 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:31 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पुष्पक एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ''जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.#jalgaon pic.twitter.com/NHTUr1JTqw