जळगाव रेल्वे दुर्घटना: CM फडणवीस म्हणाले-:मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, जखमींचा संपूर्ण उपचार मोफत

2 hours ago 1
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येईल. जखमींच्या नातेवाईकांना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीष महाजन घटनास्थळी दाखल झाले असून सर्व परिस्थिती सांभाळत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सायंकाळी 4 च्या सुमारास घडली दुर्घटना कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 11 जण ठार, तर 40 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. परिणामी, दुसऱ्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना रेल्वे येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळेच वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक चिरडले गेले. घटनास्थळ मुंबईपासून 400 किमी अंतरावर आहे. वाचा पूर्ण बातमी... जळगाव रेल्वे दुर्घटनेचे ह्रदयद्रावक PHOTOS:शरीराचे अवयव तुटलेले, रेल्वेखाली छिन्नविच्छिन्न मृतदेह, घटनास्थळावर टाहो या अपघातानंतर घटनास्थळावर शरीराचे तुटलेले अवयव व छिन्नविछिन्न मृतदेह दिसत होते. उपस्थितांचा टाहो घटनास्थळावर ऐकू येत होता... वाचा पूर्ण बातमी...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article