जळगाव रेल्वे अपघात Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 5:06 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:06 pm
पुढारी ऑनलाईन डेस्कः जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून यामध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घनेतील मृतांमध्ये ३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. मृतांना रेल्वेप्रशासनाकडून ५ लाखांची मदत करण्यात आली आहे.
कमला नवीन भडांरी (महिला वय ४३ रा. मुंबई), लच्छुराम खत्री पाशी (वय ४० रा नेपाळ), इम्तियाज अली (वय ३५ रा. उत्तर प्रदेश), नसरुद्दीन बदरुद्दीन सिद्दीकी (वय १९ रा. उत्तर प्रदेश) जवकला भटे जयवडी (महिला , वय ८० रा. नेपाळ ) हिनू नंदराम विश्वकर्मा (रा. नेपाळ), बाबू खान (वय २७ रा उत्तर प्रदेश), तर एका मृत महिलेची व तिन मृत पुरषांची ओळख पटलेली नाही.
या दुर्घटनेत एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २४ जखमी आहेत. यापैकी शासकीय महाविद्यालयात 15 ,गोदावरी हॉस्पिटलमध्ये 5 ,विघ्नहर्ता रुग्णालय पाचोरा येथे 5 जणांवर उपचार सुरु आहेत.
रेल्वेतर्फे तातडीची मदत जाहीर
या अपघात जखमी झालेल्यांना रेल्वे प्रशासनाने तातडीची मदत जाहीर केली. यामध्ये मृतांना प्रत्येकी ५ लाख, कायम अपगंत्व आलेल्यांना २ लाख ५० हजार, तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.