जातीपातीच्या राजकारणात राहुल गांधी अव्वल- शिवराजसिंह चौहान
2 hours ago
1
जातीपातीचे राजकारण करण्यात राहुल गांधी अव्वल असल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. शनिवारच्या राहुल गांधींच्या सभेनंतर रविवारी चौहान यांची येथे सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला आलेले चौहान म्हणाले, भाजप संविधान हातात नव्हे, तर डोक्यावर घेऊन राज्यघटनेचा सन्मान करते. ही राज्यघटना प्रत्येक घरात असली पाहिजे. त्याचे दररोज वाचन झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र राहुल गांधी जातीपातीचे राजकारण करण्यासाठी ती घटना सतत हातात घेऊन फिरताहेत. त्यांच्या मते या मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे चांगले काम झाले आहे. शिवाय आमचे सरकार सोयाबीनला ६ हजार, कापसाला ७ हजार १२१ तर तुरीला ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नांदगाव खंडेश्वरमध्ये पंकजा मुंडेची सभा धामणगाव रेल्वे मतदारसंघाचाच एक भाग असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचीही सभा झाली. या मतदार संघाच्या विकासाचे अभिवचन देते, असे म्हणत त्यांनी युतीच्या गतकाळातील मुद्द्यांना हात घातला. त्या म्हणाल्या, भाजप महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज बिल झीरो केले. लाडक्या बहिणीच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले. कृषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला. २० टक्के भावांतर सरकारने जाहीर केले. त्यामुळे ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ असे म्हणत त्यांनी मविआच्या उमेदवारांना प्रश्न विचारा, असा सल्ला मतदारांना दिला. या वेळी पुरुषोत्तम बनसोड, चरणदास इंगोले, रवींद्र मुंदे, सुरेश गायधनी, जयंत डेहनकर, राजू हजारे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी उपाध्याय यांनी केले, तर आभार मनोज डहाके यांनी मानले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)