Manoj Jarange Patil | जरांगे-पाटील यांच्या सभेत आचारसंहितेचा भंग

2 hours ago 1

खडक माळेगाव आणि लासलगाव येथे शनिवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास जरांगे-पाटील यांची सार्वजनिक रस्त्यावर सभा घेतली गेली होती. याठिकाणी सुमारे ५००-६०० नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याने आचारसंहितेचा भंग झाला म्हणून येवला पंचायत समितीचे दीपक सोनार व सहायक प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लासलगाव येथील जयदत्त होळकर, प्रवीण कदम, डॉ. विकास चांदर, उत्तम कदम, डॉ. सुजित गुंजाळ, ललित दरेकर (रा. निमगाव वाकडा), प्रसाद फापाळे, तर खडक माळेगाव येथील विकास रायते, विक्रम शिंदे, राकेश रायते, गोकुळ शिंदे, सागर रायते, योगेश रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article