भारतातील सात ठिकाणे जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, कारण आश्चर्यकारक, महाराष्ट्रातील…

1 hour ago 1

देशभरात दिवाळी हा सण अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. देशातील सर्वच धर्मियांकडून दिवाळी साजरी केली जाते. तब्बल चार ते पाच दिवस हा सोहळा असतो. या निमित्ताने एकमेकांना गिफ्ट दिले जातात. घरात दिव्यांची आरास मांडली जाते. दिवाळीच्या निमित्ताने फराळ केलं जातं. कुटुंबीय एकत्र मिळून हे फराळ घेत असतात. तसेच एकत्र मिळून फटके फोडून आपला आनंद व्यक्त करत असतात. यात बच्चे कंपनी सर्वात आघाडीवर असते. दिवाळी म्हटल्यावर बच्चे कंपनीच्या जणू अंगातच येतं. पण देशात अशी सात राज्य आहेत, तिथल्या गावात दिवाळी साजरी केली जात नाही. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि हिमाचल या सात राज्यातील गावात दिवाळी साजरी केली जात नाही.

केरळ

केरळमध्ये दिवाळीच्या दिवशी वामनची पूजा केली जाते. राजा बळीच्या स्मरणात अनुष्ठान केले जातं. केरळची संस्कृती आणि पौराणिक मान्यतेचा हा एक भाग आहे. केरळच्या संस्कृतीत दिवाळी हा उत्सवच नाही. नाही त्यामुळे केरळमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही.

कर्नाटकात शोक

कर्नाटकातील मेलकोटच्या मंड्यम अयंगर (एक पुजारी वर्ग) दिवाळीला शोक दिवस मानतात. 18व्या शतकात मंड्यम अयंगर मैसूर (आता मैसूर)च्या वोडेयार राजाप्रती निष्ठा होती. त्यांनी टीपू सुल्तानशी लढण्यासााठी वोडेयारांना मदत करण्यासाठी इंग्रजांशी गुप्त संधान बांधलं होतं. टिपू सुल्तान यांना या कराराची माहिती मिळाली. त्यांनी 1790मध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी मेलकोटवर हल्ला केला. आणि या समुदायातील 800 निशस्त्र लोकांची हत्या केली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी हे लोक शोक पाळतात.

तामिळनाडू

तामिळनाडूच्या त्रिचीजवळच्या थोप्पुपट्टी आणि सामपट्टी गावातील लोक दिवाळी साजरी करत नाहीत. फटाके फोडल्याने वडाच्या झाडावरील घुबडांना त्रास होतो म्हणून हे लोक दिवाळी साजरी करत नाहीत. येथील लोक वडाच्या झाडाला पवित्र मानतात. त्यांचा देव मुनियप्पा सामी यांचा वास या झाडावर असल्याची अख्यायिका या लोकांमध्ये आहे.

राजस्थान

राजस्थानच्या मंडोरमध्ये दिवाळीचा उत्साह नसतो. मंडोर नावाच्या ठिकाणी मंदोदरी देवीने रावणाशी विवाह केला होता. त्यामुळे हे लोक रावणाला जावई मानत असल्याने ते दिवाळी साजरी करत नाहीत.

उत्तराखंड

उत्तराखंडच्या कांगडमधील बैजनाथ गावातील लोक रावणाला महान शिवभक्त मानतात. दंतकथेनुसार या गावात शिवतपस्या करताना रावणाने आपले दहा शीर अर्पण केले होते. त्यामुळे या गावात दिवाळी साजरी केली जात नाही.

महाराष्ट्र

गडचिरोलीचे गोंड आदिवासी सीताहरणाचा प्रसंग स्वीकारत नाही. दंतकथेनुसार रावण गोंड वंशीय राजा होता. प्रभू रामाशी त्यांचं युद्ध झालं. त्यामुळे हे लोक दिवाळी साजरी करत नाहीत.

हिमाचलमध्ये शाप

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात सम्मू नावाचं गाव आहे. या गावात दिवाळीच्या काळात एक दिवाही पेटत नाही. एक फटाकाही वाजत नाही. थोडक्यात या गावातील लोक दिवाळीच साजरी करत नाही. या गावातील लोक दिवाळी साजरी करत नाही. शतकानुशतकापासून या गावातील लोक दिवाळी साजरी करत नाहीत. अनेक पिढ्यांपूर्वी एका महिलेने गावाला शाप दिला होता. दिवाळीच्या दिवशी सती होण्याचा तिने शाप दिला होता. त्यामुळे दिवाळीच्या काळात दिवाळी तर दूरच राहिली, साधे पंच पक्वान्न आणि फराळही गावात बनवले जात नाही. दिवाळी साजरी केली तर गावावर मोठं संकट येईल किंवा मृत्यूचं तांडव सुरू होईल, अशी या गावातील लोकांची धारणा आहे. त्यामुळेच गावात दिवाळी साजरी केली जात नाही.

शापाची कहाणी काय?

दिवाळी साजरी न करण्यामागे एका शापाची कहाणी आहे. एक महिला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर सती गेली होती. दिवाळीच्या दिवशी ही महिला आईवडिलांच्या घरी जायला निघाली होती. पण अचानक रस्त्यात तिला तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याची खबर मिळाली. त्यामुळे या महिलेला प्रचंड धक्का बसला. हा धक्का ती सहन करू शकली नाही. त्यामुळे तीही नवऱ्यासोबत सती गेली. पण सती जाण्यापूर्वी तिने अख्ख्या गावालाच शाप दिला. तेव्हापासून या गावातील लोक दिवाळी साजरी करत नाही. दिवाळीच्या दिवशी गावकरी या सतीची फक्त पूजा करतात, पण दिवाळी साजरी करत नाहीत.

घरातच राहतात

गावातील एका बुजुर्गाने याबाबतची माहिती दिली. गेल्या 70 वर्षापासून मी या गावात दिवाळी साजरी झालेली पाहिली नाही. जेव्हा कोणीही गावात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं दुर्देवानं नुकसान होतं. त्यामुळेच आम्ही दिवाळीच्या दिवशी घराच्या आतच राहणं पसंत करतो. या शापातून मुक्तता मिळावी म्हणून हवन आणि यज्ञही केले. पण ते सर्व अयशस्वी ठरल्याचं या बुजुर्ग व्यक्तीचं म्हणणं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोत आणि प्रचलित अख्यायिकांवरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article