Published on
:
18 Nov 2024, 6:35 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:35 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळीत सभांची गर्दी ४ ते १५ नोव्हेंबरपर्यंत चालली. यासाठी प्रमुख नेत्यांसह प्रचारकांनी चिकलठाणा विमानतळावर हजेरी लावली होती. या ११ दिवसांच्या कालावधीत चिकलठाणा विमानतळांवर सुमारे १५० ते १६० चार्टर विमान, हेलिकॉप्टर, विशेष विमानांची ये जा झाली. सभां संपताचा विमानांचीही वर्दळ थंडावली असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली.
उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या दिवसांपासून सभा प्रचार फेऱ्यांना मरुवात याली याच दिवसांपामन प्रमुख नेत्यांच्या प्रचार फेर्यों व सभांसाठी प्रमुख प्रचारकांनी मराठवाडा पिंजून काढला. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मध्य ठिकाणी आणि विमान, हेलिकॉप्टर उतरण्यांची सुविधाअसल्याने सर्वच जण येथूनच पुढे जात होते. ४ ते १५ नोव्हेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत चिकलठाणा विमानतळावर सुमारे १५० ते १६० चार्टर विमान, हेलिकॉप्टरसह विशेष विमानांची ये जा झाली. प्रमुख नेत्यांच्या सभांचा कार्यक्रम संपताच विमानतळांवरील विमानांची वर्दळ थंडावली आहे.
१५ ते २० विमानांची ये -जा येथील विमानतळावरून सकाळपासून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, उदयपूर, बंगळुरू, नागपूर आदी मार्गांवर विमानसेवा सुरू आहे. विधानसभेच्या प्रचारांची रणधुमारळी सुरू होताच चिकलठाणा विमानतळांवर हेलिकॉप्टरसह चार्टर विमानांची वर्दळ वाढली. या काळात दररोज १५ ते २० विमाने या ठिकाणी ये- जा करत होते. दरम्यान एकाच दिवसांत १०० विमानांना सेवा देण्याची क्षमता येथील विमानतळावर असल्याने व्हीआयपींच्या येणाऱ्या विमानांना सेवा देण्यात विमानतळ प्रशासनाला कुठलीच अडचण आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
१५ नोव्हेंबरला वर्दळ
जिल्ह्यात सर्वात मोठ्या सभा या १५ नोव्हेंबर रोजी होत्या. शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा असल्याने या दिवशी दिवशी विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. आता अशा मोठ्या सभांचा कार्यक्रम नसल्याने विमानांचीही वर्दळ थंडावली आहे. प्रचारांसाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने मोठ्या सभांचे नियोजन शहरात नसल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली.