ठाकरे गटाची शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार:प्रकाश सुर्वेंनी नावाचा गैरवापर करत बदनामी केली- उदेश पाटेकर

2 hours ago 1
मागाठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला होता. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यात ठाकरे गटाच्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांकडून नावाचे साधर्म्य साधून गैरवापर करण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान उदेश पाटेकर पुढे बोलताना म्हणाले की, मी निवडणूक लढवत असताना माझ्या नावाचा गैरवापर करत शिवसेना शिंदे गटाकडून बदनामी करत आहे. दुसऱ्या उमेदवाराला मी समर्थन करीत असल्याचे खोटे विधान करून माझी सार्वजनिकरीत्या बदनामी तसेच मतदारांना संभ्रमित करून माझ्या निवडणुकीवर विपरीत परिणाम करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. उदेश पाटेकर पुढे बोलताना म्हणाले की, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. मी माघार घेतलेली नाही. ना कोणत्या उमेदवारास पाठिंबाही दिलेला नाही. एक अपक्ष उमेदवार राकेश शांताराम पाटेकर आहे. त्याचे नावे मतदार यादी अथवा मतदान पत्रिका EVM बॅलेटसध्ये राकेश उर्फ उदेश शांताराम पाटेकर असे कोठेही नमूद केलेले नाही. नेमके काय म्हणाले पाटेकर? उदेश पाटेकर म्हणाले की, माझ्या नावाचे साधर्म्य साधून (गैरवापर करून) दुसऱ्या उमेदवाराला मी समर्थन करीत असल्याचे खोटे विधान करून माझी सार्वजनिकरीत्या बदनामी तसेच मतदारांना संभ्रमित करून माझ्या निवडणुकीवर विपरीत परिणाम करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. तसेच भारतीय न्याय संहितेतील प्रावधनांन्वये गुन्हा केलेला आहे. सदर पत्रके दुसरे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे सहकारी शिवाजी शेंडगे व तसेच राकेश पाटेकर इतर साथीदारांनी जाणीवपूर्वक विक्रेत्यांना वाटप करण्यासाठी दिली आहेत. या बाबत राकेश पाटेकर प्रकाश सुर्वे, शिवाजी शेंडगे, प्रकाशक विजय बनसोडे, विपुल दोशी, प‌द्माकर सूर्यवंशी, माऊली इंटरप्राईझ, वृत्तपत्र विक्रेते, पत्रक वाटप करणारे नागरीक यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच नोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अन्वये त्वरीत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व कायदेशीर कारवाई करावी अशी नम्र विनंती आहे. मतदारसंघात काय परिस्थिती? मागाठाणे मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश सुर्वे, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून उदेश पाटकर आणि मनसेचे नयन कदम हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेच्या मतामध्ये फुट पडल्याने मनसेचे प्रवीण दरेकर विजयी झाले होते. यंदा दोन शिवसेनेचे दोन उमेदवार असल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार शिंदे गट आणि ठाकरे गट यापैकी कोणाच्या पारड्यात दान टाकणार, यावर मागाठाणे मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. ही मतं महायुतीचे उमेदवार असलेल्या प्रकाश सुर्वे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. 2009 साली मागाठाणे मतदारसंघातून प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. 2019 मध्ये मनसेच्या नयन कदम यांनी जवळपास 50 हजार मते घेतली होती म्हणून त्यांची या मतदारसंघात ताकद असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार उभे असल्याने यात मनसेचा उमेदवार जिंकू शकेल अशी चर्चा होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article