तुम्ही कधी चेक केलंय का की तुमचा स्मार्टफोन हॅक आहे की नाही, नसेल केलं तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला असे 5 मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही, याची कल्पना येईल. चला जाणून घेऊया या 5 ट्रिक्स.
फोन हॅक झालाय? कसं ओळखायचं? Image Credit source: Instagram
तुम्ही फोन हॅकबद्दल अनेकदा ऐकलं असेल. पण, तुमचा फोन हॅक झाल्यास तुम्ही काय कराल, याविषयची तुम्हाला माहिती आहे का, नसेत तर चिंता करू नका. यावर आम्ही आज माहिती देणार आहोत. सायबर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसून तुमची खासगी माहिती चोरू शकतात, तुमच्या बँक खात्यात प्रवेश करू शकतात आणि तुमची हेरगिरी करण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करू शकतात. पण, चिंता करू नका. यावरचा उपायही आम्ही खाली सांगणार आहोत.
तुम्हाला माहित आहे का की फक्त एका छोट्या ‘लाईट’मुळे तुम्हाला फोन हॅक झाल्याची माहिती मिळेल. अशाच पद्धतींबद्दल आम्ही आज माहिती देणार आहोत. तुम्ही स्मार्टफोन वापरता पण तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही हे कसं कळणार? हे जाणून घेण्याचे काही सोपे मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या फोनची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी तपासू शकता. जाणून घ्या.
फोन हॅकिंगचे 5 संकेत
- विचित्र जाहिराती आणि पॉप अप्स: जर तुमच्या फोनवर अचानक विचित्र जाहिराती येऊ लागल्या, विशेषत: जेव्हा तुम्ही इंटरनेट ब्राउझ करत असाल तर सावध व्हा. तुमचा फोन हॅक झाल्याचं हे लक्षण असू शकतं.
- डेटा वापरात अचानक वाढ: तुम्ही आधीसारखा फोन वापरला असेल, पण अचानक तुमचा डेटा खूप जात असेल तर तुमचा फोन हॅक झाला असावा.
- अचानक नवे अॅप्स दिसणे: तुमच्या फोनमध्ये अचानक असे अॅप्स आले असतील. हे अॅप्स तुम्ही स्वत: डाऊनलोड केले नसेल, तर हे देखील धोक्याचे लक्षण असू शकते. हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये व्हायरस टाकू शकतात, त्यामुळे हॅकर्स तुमची माहिती चोरू शकतात.
- बॅटरी लवकर संपते: तुम्ही आधीप्रमाणेच फोन वापरत आहात, पण बॅटरी लगेच संपत आहे. समजा तुमचा फोन हॅक झाला असावा.
- कॅमेऱ्याचा लाईट: हे चिन्ह आपण सुरुवातीला नमूद केले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा वापरत नसता, तरीही त्याचा कॅमेरा ‘लाईट’ (इंडिकेटर लाईट) चालू असतो, तेव्हा तुमचा फोन हॅक झाल्याचं हे मोठं लक्षण आहे.
असे होऊ शकते की एखाद्या हॅकरने आपल्या फोनमध्ये स्पायवेअर टाकले असेल, जेणेकरून तो आपल्या फोनचा कॅमेरा वापरून आपली हेरगिरी करत असेल.
हे सुद्धा वाचा
फोन हॅक झाल्यास काय करावे?
तुमचा फोन हॅक झाला आहे असं वाटत असेल तर लगेच त्याचा पासवर्ड बदला. याशिवाय तुम्हाला दिसणारे सर्व विचित्र आणि अनोळखी अॅप्स अनइन्स्टॉल करा. यानंतर फोन रिसेट केला.