राज्यात 175 जागांसह महायुतीची सत्ता येणार:अजित पवार यांचा दावा

2 hours ago 1
राज्यात मिळणाऱ्या नागरिकांच्या प्रतिसादामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे १७५ उमेदवार निवडून येतील व पुढील पाच वर्षे महायुतीचीच सत्ता असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. भाळवणी (ता. पारनेर) येथे रविवारी (१७ नोव्हेंबर) आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, की केंद्रात व राज्यात समविचारी पक्षांचे सरकार असेल आणि मतदार संघाचा लोकप्रतिनिधीही समविचारी पक्षांचा असेल, तर विकासकामात अडचणी येत नाहीत. त्यामुळे काशिनाथ दाते यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन करून पवार यांनी दाते यांना निवडून दिल्यास पुढील पाच वर्षे सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार असल्याचे सांगितले. माजी खासदार डॉ. सुजय विखे, उमेदवार काशीनाथ दाते, जिल्हा उर्वरित पान ४ बंडखोर उमेदवार औटी यांचा दातेंना पाठिंबा महायुतीचे बंडखोर उमेदवार पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी काशीनाथ दाते यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावर पवार म्हणाले, की माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांचे कुटुंब कोणत्या अडचणीतून गेले, त्यांना कोणी त्रास दिला, याची मला माहिती आहे. औटी यांना वाऱ्यावर सोडणार नाही. निवडणूक संपली, की औटी यांना त्रास देणारे आहेत आणि मीही आहे, या शब्दांत पवार यांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता इशारा दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article