Published on
:
18 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:02 am
मालेगाव : देशातून वक्फची मालमत्ता संपविण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक आणले जात आहे. मशिदी, दर्गा, कब्रस्तान यांच्या जागा हिसकावल्या जातील. हा कायदा सरकारने मंजूर केला, तर विरोधात उभे राहण्याची तयारी ठेवा, असे आवाहन 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी येथे केले.
मालेगाव सभेत ते बोलत होते. ओवैसी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्यने एकतर्फी मतदान केल्याने वोट जिहाद झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत.
धुळे मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाला मते देणाऱ्या मालेगावच्या मुस्लीम जनतेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.