कचऱ्याच्या ढिगात ठाणे हरवले असून ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पुरेसे पाणीही नाही. रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटतो आहे. गेल्या १० वर्षांत भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याची घुसमट केली असून ती सोडवली नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी केली.
स्वच्छ प्रतिमेचा टेंबा मिरवणाऱ्यांनी ठाणे अस्वच्छ ठेवले असून गेल्या काही दिवसांत ठाणे बदललंय, ठाणे स्वच्छ आणि सुंदर होतंय अशा घोषणा दिल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात कचऱ्याच्य ढिगांचे अस्वच्छ ठाणे म्हणून ओळखू लागले आहे. डम्पिंग ग्राऊंड, वाहतूककोंडी, कोस्टल रोड हे महत्त्वाचे प्रकल्प सोडवण्यात विद्यमान आमदार सपसेल अपयशी ठरले असल्याची टीका राजन विचारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आदी उपस्थित होते.
ही कामे करणार
- ठाण्याची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्राधान्य
- शहराची कचराकोंडीतून मुक्तता, झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार
- मासुंदा तलावाच्या काठावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार
- गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेचे स्मारक उभारणार
- सिंगापूरच्या धर्तीवर मासुंदा तलाव