निवडणुकांनंतर दुसऱ्या दिवशी सुट्टीची कर्मचारी वर्गाची मागणी

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Nov 2024, 6:24 am

Updated on

18 Nov 2024, 6:24 am

वाडा : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजून आचारसंहिता सुरू झाली की उमेदवारांच्या आधीपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु होतात. मतदानकेंद्राची खरी जबाबदारी स्वीकारणारे अनेक शिक्षक व अन्य कर्मचारी आपले नाव कर्मचाऱ्यांच्या यादीत येऊ नये यासाठी अक्षरशः देव पाण्यात बुडवून ठेवतात. खरेतर शिक्षक हा शिस्तप्रिय व तुलनेत अधिक जबाबदार असल्याने वर्षानुवर्षे शिक्षकांची इलेक्शन ड्युटी फिक्स असते.

सरकारची मात्र गरज सरो, वैद्य मरो अशी भूमिका असल्याने कर्मचाऱ्यांचा निवडणूक कामांसाठी नाराजीचा सूर असून निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. विक्रमगड व शहापुर व भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदार क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना वसई, विरार, नालासोपारा, डहाणू अशा ठिकाणी निवडणुकीचे काम बजावण्यासाठी जावे लागते तर त्या भागातील कर्मचाऱ्यांना जव्हार , मोखाडा व विक्रमगड या भागात यावे लागते. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ३५८ मतदानकेंद्र असून यात जवळपास १ हजार ८०० कर्मचारी सहभागी आहेत.

भिवंडी ग्रामीणमध्ये जवळपास ३४१ मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रांवर ५ ते ६ कर्मचारी संख्या आहे. निवडणुकीच्या आधी प्रशिक्षण, निवडणुकीच्या आदल्या दिवशीपासुन कामाला सुरुवात, आपल्या सोबत कोण सहकर्मचारी आहेत याची माहिती करून निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, मतदान केंद्रांचा ताबा घेउन साहित्याची जुळवाजुळव करणे अशा कामांचा कर्मचाऱ्यांना नकळत ताण सहन करावा लागतो. महिला कर्मचारी केंद्राच्या जवळ असेल तर अधिकाऱ्यांच्या परवानगीने घरी जाण्याची मुभा असते मात्र मतदानाच्या दिवशी पहाटे पाच वाजता मतदान केंद्रावर हजर राहावेच लागते. शक्यतो महिला कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरचं थांबल्या शिवाय पर्याय नसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article