तुमच्या जिभेची चव बदलली, असं तुम्हाला वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. एखाद्याला फ्लूचा आजार होतो तेव्हा जिभेची चव बदलते. ही एक सामान्य शारीरिक समस्या आहे. पण, काही प्रकरणांमध्ये ही वेगवेगळ्या आजारांची लक्षणे देखील असू शकतात. याविषयी जाणून घ्या.
आपले जीवन अन्नाशिवाय फार काळ टिकू शकत नाही. किंवा आपण जीवंत राहू शकत नाही. परंतु प्रत्येकजण केवळ जीवंत राहण्यासाठी अन्न खात नाही. त्याला अन्नाची चांगली चव लागते आणि अर्थातच ही चव आपल्याला जिभेमुळे कळते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, जिभेमुळे अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात. खरं तर आपण आजारी असताना आपल्या जिभेची चव आणि रंगही बदलतो, म्हणूनच उपचारादरम्यान डॉक्टर अनेकदा आपली जीभ पाहतात.
जिभेची चव केव्हा बदलते?
1. फ्लू (Flu)
फ्लूचा आजार होतो तेव्हा जिभेची चव कमी होऊ शकते किंवा बदलू शकते. ही एक सामान्य शारीरिक समस्या आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये ही रोगाची लक्षणे देखील असू शकतात. यामुळे दुर्लक्ष केल्यानं तुम्हाला याचा धोका होऊ शकतो.
2. मधुमेह (Diabetes)
मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा जिभेच्या चवीत बदलांना सामोरे जावे लागते. त्यांच्या रक्तातील साखरेची स्थिती शोधण्यासाठी हे महत्वाचे असू शकते.
3. दातांच्या समस्या (Dental Problems)
दातांच्या समस्येमुळे जिभेच्या चवीवरही परिणाम होऊ शकतो. जिंजिवाइटिस, पोकळी किंवा तोंड स्वच्छ न ठेवल्यामुळे अशा समस्या खूप सामान्य आहेत.
4. न्यूरोलॉजिकल समस्या (Neurological Problems)
न्यूरोलॉजिकल समस्या पार्किन्सन रोग (Parkinson’s Disease), अल्झायमर (Alzheimer’s) किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) सारख्या अनेक न्यूरोलॉजिकल रोगांमुळे जिभेच्या चवीत बदल होऊ शकतात.
5. खोकला आणि सर्दी (Cough and Cold)
खोकला आणि सर्दी यामुळे जिभेची चव कमी होऊ शकते, कारण नाक बंद झाल्यामुळे खरं तर आपल्याला चव कळण्यासाठी नाकही जबाबदार असतं. सर्दीत म्हणून चव कळत नाही.
6. कोरोना (COVID-19)
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला होता, हे तुम्हाला माहिती आहे. या दरम्यान अनेकांना जिभेची चव कमी जाणवली. त्यामुळे कोरोना हे देखील महत्त्वाचे लक्षण असू शकते.
एक लक्षात घ्यायला हवं की, जिभेची चव बदलते तेव्हा काही प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या आजारांची लक्षणे देखील असू शकतात. पण, कधी कधी सर्दी-खोकला अशा छोट्या आजारांमुळे देखील चव बदलू शकते. यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही.