जिल्हा लिंगायत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड:अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी विशाल निकाडे, उपाध्यक्षपदी अमोल झळके यांची निवड
6 days ago
2
अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती व कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील लिंगायत संघर्ष समिती पदाधिकारी व समाज बांधव यांची बैठक समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये लिंगायत समाजाचे लोकनेते ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा लिंगायत संघर्ष समिती जिल्हा कार्यकारणीमध्ये श्रीरामपूर येथील विशाल निकाडे यांची कार्याध्यक्षपदी, तर राहात्यातील अमोल झळके यांची जिल्हा कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. विशाल निकाडे हे १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून श्रीरामपूर तालुक्यातील लिंगायत समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. राहाता तालुक्यातील अमोल झळके हे व्यापारी असून शिवगर्जना मंडळाच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक कार्याला त्यांनी वाहून घेतले. राहाता तालुक्यातील लिंगायत समाजातील बांधवांना एकत्र करून महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन प्रत्येक वर्षी करतात. यावेळी किशोर सोसे, दिनेश वाडनकर, प्राचार्य विकास शिवगजे, दत्तात्रय विरकर, गिरीश सोनेकर, मधुकर झळके, प्रकाश वाळेकर, अनिल जंगम, विलास वाळेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार प्रदीप साखरे यांनी मानले. जिल्हा लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी गोपीनाथ निळकंठ म्हणाले, लिंगायत समाजाचे लोकनेते काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन लिंगायत संघर्ष समितीचे संघटन मजबूत केले. निवड झालेल्या तरुण, युवा पदाधिकाऱ्यांनी संघटनेसाठी काम करून प्रगतीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. समितीमुळे समाजाच्या १४ पोटजातींना आरक्षण लिंगायत संघर्ष समितीमुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या १४ पोटजातींना आरक्षण मिळाले. लिंगायत संघर्ष समितीची ताकद वाढवण्यासाठी संघटनेतील तरुण, युवा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने जबाबदारी पार पाडावी, असे समितीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)