बारामती जिल्हा होणार? विखे पाटील स्पष्टच म्हणाले, अशा प्रकारच्या वावड्या कोण...file photo
Published on
:
02 Feb 2025, 8:24 am
Updated on
:
02 Feb 2025, 8:24 am
नगर: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 912 कोटी 78 लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण’साठीच्या 702 कोटी 89 लाख रमकेचा समावेश आहे. यामध्ये आणखी 150 कोटी निधीची मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्याचे निश्चित करण्यात आले.
दरम्यान, 2024-25 या आर्थिक वर्षात ‘सर्वसाधारण’साठी मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करुन गुणत्तापूर्ण कामे करण्याचे सर्व विभाग प्रमुखांना पालकमंत्री विखे पाटील यांनी निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, झेडपी सीईओ आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यासाठी आगामी वर्षात आवश्यक असणार्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यात 144 कोटी अनुसूचित जाती योजनेसाठी तर 65 कोटी 89 लाख रुपये आदिवासी उपयोजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित आराखड्यापैकी 175 कोटी 72 लाख 25 हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
5 फेब्रुवारीला नियोजनची राज्यस्तरीय बैठक होणार असून, या बैठकीत आगामी वर्षातील सर्वसाधारण योजनेचा 702 कोटी 89 लाख रुपयांचा आराखडा सादर केला जाणार असून, याच बैठकीत ‘सर्वसाधारण’साठी 150 कोटी रुपये अतिरिक्त मागणी करण्यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला.
2024-25 या वर्षाच्या सर्वसाधारण योजनेसाठी आतापर्यंत शासनाकडून प्राप्त 364 कोटी 63 लाख रुपये निधीपैकी 244 कोटी 26 लाख रुपयांचा निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.
पिंजर्यांची संख्या वाढवा
वन विभागाने बिबट प्रवण क्षेत्रात घरांभोवती कुंपण घालण्यासाठी आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्ह्यासाठी विशेष योजना प्रस्तावित करावी. बिबट्यांना पकडण्यासाठी प्राधान्याने पिंजार्याची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. वन पर्यटनासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी वन विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील 14 तीर्थक्षेत्रांना ‘क’ दर्जा
निळवंडे : श्री दत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफनाथ, पुणेवाडी : श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, गळनिंब : श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान, तांदळी वडगांव : श्री सद्गुरू धर्मराज देव मंदिर, आश्वी बुद्रुक : श्री चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान, टाकळी : श्री महालक्ष्मी, मारुती मंदिर देवस्थान, मेहेंदुरी : श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, डाऊच खुर्द : श्री महादेव मंदिर देवस्थान, सडे : श्री महादेव मंदिर देवस्थान, भोजडे : श्री राजा वीरभद्र देवस्थान, राहाता शहर : श्री वीरभद्र देवस्थान व श्री नवनाथ महाराज मंदिर, अस्तगाव : श्री जगदंबा माता मंदिर, मिरजगाव : श्री भैरवनाथ देवस्थान या 14 तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.